
₹१०.५२ लाखांचा गांजा व पजेरो स्पोर्ट कार जप्त. अमली पदार्थ तस्करीविरोधातील मोठी कारवाई; एक आरोपी अटकेत.
TIN24 EDITOR : अमित अल्हाट
करमाळा | ३० जुलै २०२६ : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करत ₹२,५२,५०० किमतीचा १० किलो १०० ग्रॅम गांजा तसेच ₹८ लाख किमतीची सिल्व्हर रंगाची पजेरो स्पोर्ट कार जप्त केली. या कारवाईत एकूण ₹१०,५२,५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी रात्री पांगरे परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती करमाळा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहन अडविले.
तपासणीदरम्यान वाहनातून पाच प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवलेला १० किलो १०० ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली सिल्व्हर रंगाची पजेरो स्पोर्ट कार (MH-12-KF-9699) देखील जप्त करण्यात आली.
या प्रकरणात रोहित शिवाजी केचे (वय २४, रा. गारअकोले, ता. माढा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा क्रमांक ६४४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
