TIN24 संपादक अमित अल्हाट सोयाबीन, उडीद, मूग आणि तुरीच्या विक्रमी खरेदीला हिरवा कंदील; शेतकऱ्यांना MSP चा थेट फायदा नवी दिल्ली, २८ : केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ साठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि मध्य प्रदेश या चार राज्यांतील डाळी आणि तेलबिया पिकांच्या खरेदीला ₹१५,१०० कोटी रुपयांच्या विक्रमी निधीसह मंजुरी दिली आहे. या योजनेद्वारे लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळेल आणि बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण मिळेल. श्री. चौहान यांनी आज या राज्यांच्या कृषिमंत्र्यांसोबत ऑनलाइन बैठक घेऊन ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (PM-AASHA) अंतर्गत या योजनांना अंतिम स्वरूप दिले. महाराष्ट्रासाठी मूल्य समर्थन योजना (PSS) अंतर्गत ही खरेदी अभूतपूर्व आहे. राज्यात १८,६०,००० मेट्रिक टन सोयाबीन, ३,३०,००० मेट्रिक टन उडीद आणि ३५,००० मेट्रिक टन मूग यांची खरेदी मंजूर झाली