शिवाजी पार्कातील विद्यार्थी आंदोलनात नेमकं काय घडलं? पोलिसांवर गंभीर आरोप; आता उच्च न्यायालयात धडकणार का याचिका?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिवाजी पार्क विद्यार्थी आंदोलन प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप.



मुंबई | २५ जुलै | TIN24 विशेष प्रतिनिधी

मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. आंदोलनादरम्यान महिला विद्यार्थिनींशी कारवाईच्या नावाखाली अश्लील स्पर्श करून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप पोलिस शिपाई दिपक बल्लाळ यांच्यावर करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील वकील, समाजसेविका व मानवी हक्क कार्यकर्त्या ॲड. शोभा बुद्धिवंत यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर त्वरित गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, जर तातडीने कारवाई झाली नाही तर अॅड. नितीन सातपुते यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.

या प्रकरणात आणखी गंभीर आरोप करताना असेही म्हटले गेले आहे की, आंदोलनादरम्यान काही पोलिस कर्मचारी आंदोलनकर्त्यांना अमली पदार्थ खिशात टाकून NDPS कायद्यानुसार खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होते. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी केवळ निलंबन पुरेसे नसून त्यांच्याविरोधात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Adv. नितीन सातपुते यांच्या माहितीनुसार, संबंधित पोलिस कर्मचाऱ्याकडे अमली पदार्थ असल्याचा आरोप असल्यास, ते पदार्थ त्याच्याकडे कुठून आले, त्याचा स्रोत काय आहे आणि त्यामागे कोणते जाळे कार्यरत आहे, याचाही निष्पक्ष तपास झाला पाहिजे.

यासोबतच एक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे — हे सर्व प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किंवा पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार घडत आहेत का? या मुद्द्यावरही उच्च न्यायालयात याचिकेद्वारे स्पष्टीकरण मागितले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

TIN24 भूमिका: वरील आरोप हे संबंधित वकिलांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले दावे आहेत. या आरोपांवर संबंधित पोलिस अधिकारी किंवा मुंबई पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. सर्व संबंधित पक्षांना आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रकरणाचा तपास, अधिकृत नोंदी आणि न्यायालयीन प्रक्रियेतील निष्कर्षानुसार तथ्य स्पष्ट होतील.

— TIN24 Editor: अमित अल्हाट

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें