मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश : MSME सर्वेक्षणातून उत्कृष्ट औद्योगिक परिसंस्था उभारणार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

MSME क्षेत्रासाठी मोठा निर्णय : फडणवीसांनी दिले सर्वेक्षण आणि नव्या धोरणांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस MSME आणि उद्योग धोरण आढावा बैठकीत

https://theindianews24.in/msme-survey-devendra-fadnavis-maharashtra

By TIN24 EDITOR AMIT ALHAT

मुंबई, दि. १७ : राज्यात देशातील सर्वाधिक गुंतवणूक येत असून या गुंतवणुकीचे प्रत्यक्ष उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी गुंतवणूकक्षम आणि रोजगारनिर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी सर्वंकष धोरणे आणणे आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याचबरोबर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून या क्षेत्रासाठी उत्कृष्ट औद्योगिक परिसंस्था उभी करण्याचेही त्यांनी सूचित केले.वर्षा निवासस्थानी आयोजित उद्योग विभागाच्या विविध धोरणांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी धोरणे तयार करताना संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, यशस्वी उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्रातील कमतरता दूर करून त्यांना चालना देणारी धोरणे तयार झाली, तर महाराष्ट्र अधिक संपन्न होऊ शकतो. यासाठी आधीपासून अस्तित्वात असलेल्या उद्योगविषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

एमएसएमई क्षेत्राबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या गरजेनुसार क्षेत्रनिहाय प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. त्या क्षेत्रांच्या क्षमतेनुसार रोजगारनिर्मिती आणि उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म तयार केले पाहिजेत. तसेच नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवून एमएसएमई क्षेत्राला अधिक स्पर्धात्मक बनवण्यावर भर दिला पाहिजे. हे क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे रोजगारनिर्मिती करणारे असल्याने त्याच्या बळकटीकरणासाठी नियोजनबद्ध काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.एमएसएमई उद्योगांचे सर्वेक्षण करताना त्यांची सद्यस्थिती, रोजगारनिर्मितीची सध्याची क्षमता, उत्पादनाची पातळी आणि भविष्यातील वाढीची शक्यता यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अशा सर्वेक्षणातून उद्योगविश्वासमोरील अडचणी, संधी आणि सुधारणा क्षेत्रे निश्चित करण्यात मदत होणार आहे.मीडिया अँड अरेना धोरणाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील मोठ्या शहरांमध्ये मोठ्या कन्व्हेन्शन सेंटर उभारणीसाठी व्यवसाय सुलभता वाढवण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच प्रस्तावित रसायन उद्योग धोरणात केमिकल पार्कचा समावेश असावा, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. राज्यातील ‘सर्क्युलर इकॉनॉमी’च्या विकासासाठीही सर्वंकष धोरण आणावे, असे निर्देश त्यांनी दिले.

मैत्री पोर्टलद्वारे सर्व परवानग्या बंधनकारक करण्याचे निर्देश

उद्योगांसंबंधित सर्व परवानग्यांसाठी मैत्री पोर्टलचाच वापर बंधनकारक करण्याच्या सूचना देताना मुख्यमंत्री म्हणाले की, या पोर्टलमार्फत दिली जाणारी सेवा दर्जेदार आणि तक्रारनिवारण प्रणाली सक्षम असली पाहिजे. गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला.प्रत्येक कॉलचे रेकॉर्डिंग करून त्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विश्लेषण केले जावे, असेही त्यांनी सांगितले. यामुळे वारंवार येणाऱ्या तक्रारी ओळखून धोरणात्मक सुधारणा करता येतील आणि उद्योगसुलभ प्रशासनाची उभारणी होऊ शकेल.

एमआयडीसी जमीनवाटपात व्यवहार्यता तपासणीवर भर

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतींमधील जमिनीचे वितरण करताना मागणीनुसार परंतु व्यवहार्यता तपासूनच जमीन देण्यात यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. जमीनवाटपासाठी तर्कसुसंगत आणि पारदर्शक पद्धती विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.या बैठकीस प्रधान सचिव (उद्योग) पी. अनबळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, विकास आयुक्त (उद्योग) कादंबरी बलकवडे, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि एआय विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आढावा घेण्यात आलेली आणि प्रस्तावित धोरणे

बैठकीत उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण २०२५, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर धोरण २०२५, AVGC-XR धोरण २०२५, जेम्स अँड ज्वेलरी धोरण २०२५, बांबू उद्योग धोरण २०२५ आणि बायो-प्लास्टिक धोरण २०२६ यांचा आढावा घेण्यात आला. तसेच लेदर, नॉन-लेदर, फुटवेअर, अपारेल्स अँड अॅक्सेसरीज, गारमेंट अँड अपारेल्स, मीडिया-एंटरटेनमेंट-अँड-अरेना, फार्मास्युटिकल, बायोटेक्नॉलॉजी अँड मेडिकल डिव्हायसेस, डिफेन्स-न्यूक्लिअर-अँड-एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स-सेमीकंडक्टर्स-फॅब-अँड-डिस्प्ले, एमएसएमई, रसायन उद्योग आणि जैवइंधन धोरणे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें