कोंकण विभागातील सामाजिक कार्यकर्त्यांना “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६” जाहीर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

TIN24 | THE INDIA NEWS 24

महाड येथे २८ जून रोजी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते होणार गौरव

महाड, दि. २६ जून (TIN24) – सामाजिक न्याय, समता, बंधुभाव आणि संविधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या श्रीमती स्मिता कवडे, श्री विजय जाधव आणि श्री महादेव गोठणकर यांना कोंकण विभागातून प्रतिष्ठेचा “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला आहे.

सामाजिक परिवर्तन, वंचित घटकांचे सक्षमीकरण आणि न्याय्य समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. या पुरस्काराची घोषणा राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६ च्या निमित्ताने करण्यात आली आहे.

ही परिषद विवेक विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे तसेच राज्यातील विविध सामाजिक सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

या वर्षीचा “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६” हा पुरस्कार रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे आणि पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी कार्यरत असलेल्या श्रीमती स्मिता कवडे, श्री विजय जाधव आणि श्री महादेव गोठणकर यांच्या या उल्लेखनीय सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

— TIN24 संपादक: अमित अल्हाट

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24