स्वर्गीय विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भावनिक सांत्वनपर भेट
फलटण | दि. 2 फेब्रुवारी 2026 | TIN24

बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा अकाली मृत्यू झाला होता. या अत्यंत दुःखद घटनेनंतर Sunetra Ajit Pawar यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत, तरडगाव (ता. फलटण) येथील जाधव कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली.
या भेटीदरम्यान स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असे आश्वासन देत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला. उपमुख्यमंत्र्यांच्या या भावस्पर्शी शब्दांनी आणि उपस्थितीने परिसरातील अनेकांचे डोळे पाणावले.
कर्तव्य आणि संवेदनशीलता यांचा समतोल साधत, जाधव कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मानवीतेचा आदर्श घालून दिला. शोकाकुल वातावरणातही दिलेला हा आधार जाधव कुटुंबीयांसाठी मोठा दिलासा ठरला.
— TIN24 EDITOR : AMIT ALHAT
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
