लोकअदालतीत ई-चलान तडजोड नाही; अफवांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

TIN24 | संपादक : अमित अल्हाट

मुंबई, दि. 06 : राज्यभर येत्या 13 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीत ई-चलान प्रकरणांची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), मुंबई यांच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. तरीही नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2021 पासून प्रलंबित असलेल्या ई-चलान प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी वाहतूक विभागाकडून महाराष्ट्र राज्य विधी व सेवा प्राधिकरणाच्या मंजुरीने प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, येत्या लोकअदालतीत वाहतूक विभागाकडून कोणतीही ई-चलान प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार नाहीत, असे अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहतूक विभागाचे नागरिकांना स्पष्ट आवाहन
ई-चलान तडजोड किंवा दंडात सूट यासंदर्भात सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. अनधिकृत लिंकद्वारे ई-चलानची रक्कम भरणा करू नये. जर एखाद्या नागरिकाचे ई-चलान प्रकरण स्थानिक जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाने तडजोडीसाठी ठेवले असल्याचे अधिकृतपणे कळवण्यात आले असेल, तर संबंधित न्यायालय किंवा स्थानिक वाहतूक पोलीस ठाण्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक (मुख्यालय) सुनील भारव्दाज यांनी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

दरम्यान, काही यूट्यूब, इंस्टाग्राम तसेच अन्य सामाजिक माध्यमांवर 13 डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान दंडात मोठी सूट मिळणार असल्याची चुकीची माहिती मोठ्या प्रमाणावर पसरवली जात आहे. या अफवांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची गंभीर शक्यता असल्याने पोलीस विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें