नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

TIN24 संपादक : अमित अल्हाट
मुंबई, दि. १ डिसेंबर २०२५

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी मतदानाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी आता काही मतदारसंघांमध्ये रद्द करण्यात आली आहे. न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ संबंधित मतदारसंघांपुरतीच ही सुट्टी रद्द करण्यात आल्याचे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील १६ जिल्ह्यांतील एकूण २१ नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये उद्या सार्वजनिक सुट्टी राहणार नाही.

यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश आहे :

ठाणे जिल्हा : अंबरनाथ

अहिल्यानगर जिल्हा : कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा

पुणे जिल्हा : बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची

सोलापूर जिल्हा : अनगर, मंगळवेढा

सातारा जिल्हा : महाबळेश्वर, फलटण

छत्रपती संभाजीनगर जिल्हा : फुलंब्री

नांदेड जिल्हा : मुखेड, धर्माबाद

लातूर जिल्हा : निलंगा, रेणापूर

हिंगोली जिल्हा : वसमत

अमरावती जिल्हा : अंजनगाव सुर्जी

अकोला जिल्हा : बाळापूर

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ

वाशिम जिल्हा : वाशिम

बुलढाणा जिल्हा : देऊळगाव राजा

वर्धा जिल्हा : देवळी

चंद्रपूर जिल्हा : घुग्गुस

या मतदारसंघांतील सरकारी कार्यालये, बँका, शैक्षणिक संस्था तसेच खाजगी आस्थापना उद्या नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. मात्र, उर्वरित ठिकाणी पूर्वनियोजित सुट्टी कायम राहील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक प्रक्रियेवर कोणताही परिणाम न होता मतदान शांततेत पार पडावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें