माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

TIN24 Editor – Amit Alhat

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण छत्रपती संभाजीनगरमध्ये .

छत्रपती संभाजीनगर, दि. 16 नोव्हेंबर :–महाराष्ट्राला दुष्काळमुक्त आणि अन्नधान्यांनी स्वयंपूर्ण करण्याचे दूरदृष्टीपूर्ण कार्य करणारे, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविणारे दिवंगत वसंतराव नाईक हे राज्याला दिशा देणारे नेतृत्व होते. त्यांच्या जलसंधारणाच्या उपक्रमांचा आजही मोठा लाभ राज्याला होत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात काढले.


सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, मंत्री पंकजा मुंडे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधा चव्हाण, मनपा आयुक्त जी. श्रीकांत आदी मान्यवर उपस्थित होते.

जलसंधारण, स्वयंपूर्णता आणि सामाजिक जागृती—नाईक साहेबांचे कार्य कायम प्रेरणादायी : फडणवीस

जलसंधारणाची क्रांती – नाईक साहेबांचे दूरदृष्टीपूर्ण पाऊल

मुख्यमंत्री म्हणाले की, 1972 च्या भीषण दुष्काळात नाईक साहेबांनी “दुष्काळाशी लढायचे असेल तर जलसंधारण हाच मार्ग” ही संकल्पना रुजविली. पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणे, जमिनीतील पाणी वाढवणे आणि माती वाहून जाण्यापासून रोखणे या उपक्रमांमुळे महाराष्ट्राची जलक्रांती घडली.

हीच प्रेरणा घेऊन जलयुक्त शिवार ही राज्यव्यापी योजना राबविण्यात आली. या योजनेचे मूळ प्रेरणास्थान म्हणजे नाईक साहेबांचे कार्य असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासात वसंतराव नाईक यांचे योगदान अधोरेखित

कृषी, जलसंधारण आणि बंजारा समाज upliftment मध्ये मोठे योगदान

नाईक साहेबांनी केवळ जलसंधारणच नव्हे तर बंजारा समाजासाठी शिक्षण, जागृती आणि विकासाची चळवळ उभी केली. पोहरादेवीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आधुनिक करण्यासाठी सरकारने 700 कोटी रुपयांचा आराखडा राबवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहरादेवी म्युझियमचे उद्घाटन झाले असून, प्रवेशद्वारातील पहिला पुतळा नाईक साहेबांचाच असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

“हा दिवस दिवाळीसारखा” – पालकमंत्री संजय शिरसाट

पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की,
“आज बंजारा समाजासाठी आणि छत्रपती संभाजीनगरसाठी दिवाळीपेक्षा कमी दिवस नाही. नाईक साहेबांचे योगदान अविस्मरणीय आहे. आगामी कुंभमेळा आणि शहराच्या विकासासाठी निधीची मोठी आवश्यकता आहे.”

मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्यास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें