महापरिनिर्वाण दिनानिमित्त आवश्यक सुविधांबाबत सूक्ष्म नियोजनाचे निर्देश – मुख्य सचिव राजेश कुमार यांचे आदेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई | दि. ११ नोव्हेंबर २०२५ | वृत्त क्र. ४३६९ | TIN24 संपादक : अमित अल्हाट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे सूक्ष्म नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अतिउत्साहाने गर्दी; नागरिकांच्या सोयींसाठी प्रशासन सज्ज .

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरातील सुविधांबाबत आढावा घेण्यात आला.

बैठकीस अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर विभागीय आयुक्त (कोकण) सिद्धराम सालीमठ, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, नगरविकास विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्या आणि महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले की चैत्यभूमी परिसरात मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सेवा व स्वच्छतेच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. दादर व आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस विभागाने रहदारीचे नियोजन आणि नियंत्रण प्रभावीपणे करावे. अनुयायांना मार्गदर्शनासाठी सूचना फलक लावले जावेत आणि प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी.

बैठकीत भोजन, आरोग्य, सुरक्षा, पिण्याचे पाणी, शौचालये, परिसर स्वच्छता, सीसीटीव्ही, विद्युतपुरवठा, पुस्तक स्टॉल्स तसेच शासकीय जाहिरात व प्रसिध्दी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने नागसेन कांबळे यांनी विविध मागण्या मांडल्या, तर महानगरपालिकेने सादरीकरणाद्वारे चालू तयारीची माहिती दिली.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें