कोंढवा पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक; ACB ची कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे, दि. १७ ऑक्टोबर २०२५ : पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने वीज चोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली आणि त्यापैकी ५ हजार रुपये स्वीकारले. या प्रकरणात एका सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकानेही प्रोत्साहन दिल्याचे उघड झाले आहे. अँटी करप्शन ब्युरो (ACB) च्या पुणे घटकाने या दोघांविरुद्ध कारवाई केली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ACB च्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ४४ वर्षे) यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये वीज चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ बापू महारनवर (वय ३४ वर्षे, रा. फ्लॅट नं. ४, ओम नमो रेसिडेन्सी, शेवाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याने १० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने १० ऑक्टोबर २०२५ रोजी ACB कडे तक्रार नोंदवली. त्यानंतर ACB ने १० आणि ११ ऑक्टोबर रोजी पडताळणी केली, ज्यात लाच मागणीची पुष्टी झाली.

पडताळणीत असे समोर आले की, महारनवर याने यापूर्वी तक्रारदाराच्या घरमालकाकडून ५ हजार रुपये घेतले होते. मात्र, या रकमेची चर्चा इतरत्र झाल्याने त्याने तक्रारदाराला पोलिस स्टेशनला बोलावून आणखी ५ हजार रुपये घरमालकाला देण्यास सांगितले. या लाच मागणीस सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक युवराज कृष्णा फरांदे (वय ५९ वर्षे, रा. स्वप्नपुर्ती बंगला, वृंदावन सोसायटी, उरूळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे) याने फोनद्वारे प्रोत्साहन दिले.

१३ ऑक्टोबर २०२५ रोजी ACB ने कोंढवा पोलिस स्टेशनसमोर सापळा रचला. महारनवर याने तक्रारदार आणि त्यांच्या घरमालकाला बोलावले. घरमालकाने महारनवरच्या समक्ष तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (१९८८) गुन्हा दाखल होत आहे.

ही कारवाई पोलिस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजीत पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सापळा अधिकारी श्रीमती निता मिसाळ (सहा. पोलिस आयुक्त, मो. ९८२२२१४४१४) आणि तपास अधिकारी श्रीमती असावरी शेडगे (पोलिस निरीक्षक, मो. ८४२५८०८०५८) यांनी हाताळली.

ACB ने आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा एजंट लाच मागत असल्यास तात्काळ संपर्क साधावा. संपर्क क्रमांक: ०२०-२६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३, ९४०३७८१०६४; व्हॉट्सअॅप: ९४०३७८१०६४ (पुणे), ९९३०९९७७०० (मुंबई); ई-मेल: dyspacbpune@mahapolice.gov.in; वेबसाइट: www.acbmaharashtra.gov.in; ऑनलाइन तक्रार: www.acbmaharashtra.net.in.

TIN24 संपादक- अमित अल्हाट

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें