जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोने येथे निरोप व स्वागत समारंभ संपन्न ..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पालघर : पालघर जिल्हा परिषद केंद्र शाळा कोने येथे जिल्हाअंतर्गत प्रशासकीय बदलीने नवीन हजर झालेले शिक्षक श्री मयूर शेलार सर यांचे सर्व मान्यवरांच्या हस्ते हार्दिक स्वागत करण्यात आले तसेच कोने शाळेतून खुपरी येथे बदली झालेले शिक्षक श्री सुनिल सिद्धा शिंदे सर यांना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. अशा दुहेरी कार्यक्रम आज जिल्हा परिषद शाळा कोने येथे पार पडला.

भावपूर्ण निरोप आणि हार्दिक स्वागताच्या क्षणात शाळा परिसरात भावुक वातावरण; शिक्षकांच्या समर्पणाचे सर्वत्र कौतुक.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद माजी सदस्या माननीय सौ भक्ती ताई वलटे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भाई वलटे सर, सौ कीर्ती भोईर मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा माननीय सौ गायत्री पांढरे मॅडम, सौ रोहिणी पांढरे, कोने गावचे सरपंच माननीय श्री रामदासजी कदम साहेब, कोने गावचे माजी सरपंच श्री चिंतामण तरसे, कोने केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री शिंदे साहेब, श्री बाळू दिवा, श्री जगदीश दुपारे, श्री रमेश भोईर, सेजल सजन दुपारे व पालक वर्ग, माजी विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक श्री सावंत सर, पदवीधर शिक्षक श्री शेलार सर, सहशिक्षक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी शिंदे सरांनी आज पर्यंत केलेल्या शैक्षणिक कामाचे कौतुक केले. अत्यंत तळमळीने शिकवणारे शिक्षक, विद्यार्थी प्रिय शिक्षक अशा शब्दात वर्णन करून त्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी शुभेच्छा दिल्या. मनोगत व्यक्त करत असताना सर्वांच्या डोळ्यात अश्रू येत होते. शेवटी सुनिल शिंदे सरांनी मनोगत व्यक्त केले.

“विद्यार्थ्यांनो शाळा शिका, खूप मोठे व्हा, आयुष्यात प्रगतीच्या शिखरावर पोहोचा आणि ते पाहण्यातच मला खूप आनंद वाटेल,” असे शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यापुढेही माझे काम मी प्रामाणिकपणे पार पाडणार अशी ग्वाही त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना दिली.

शिंदे सरांच्या मनोगतानंतर सर्व विद्यार्थी, उपस्थित पालक वर्ग, सर्व मान्यवरांनी अश्रू पूर्ण नेत्रांनी त्यांना निरोप दिला आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम शिक्षण क्षेत्रातील समर्पण आणि भावनिक बंधनाचे उत्तम उदाहरण ठरला.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें