मुंबई, दि. ७ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल, दादर येथे उभारण्यात येत असलेले भव्य स्मारक आणि पुतळ्याच्या कामाचा आढावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतला. यावेळी आनंदराज आंबेडकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट म्हणाले, समुद्राच्या शेजारी हे भव्य स्मारक साकारत आहे. या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीबाबत शिल्पकार राम सुतार यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचा विचार करण्यात आला असून त्याबाबत संबंधित विभागास अवगत करण्यात आले आहे. पुतळ्याच्या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पुतळा विहित वेळेत उभा करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

या स्मारकाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणी आणि योगदानाला एक भव्य व्यासपीठ मिळेल, जे लाखो अनुयायांसाठी प्रेरणास्थळ ठरेल. सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले असून, सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
TIN24 संपादक अमित अल्हाट .
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
