अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य द्या : मंत्री संजय राठोड..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई, दि. ६ (TIN24 प्रतिनिधी) : अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकूण ४९० कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती व व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला असून, नवीन बंधारे उभारण्यापेक्षा विद्यमान बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य द्यावे, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत.

मंत्रालयात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीबाबत आयोजित बैठकीत मंत्री संजय राठोड यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीस खासदार अनिल बोंडे, सचिव गणेश पाटील, सहसचिव विजय देवराज, अवर सचिव प्रकाश पाटील, कार्यासन अधिकारी पराग पंडित, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी श्री. निपाणी व जिल्हा जलसंधारण अधिकारी भूपेश दमाहे उपस्थित होते.

दुरुस्तीला प्राधान्य

मंत्री संजय राठोड म्हणाले, “या दोन्ही जिल्ह्यांतील बंधाऱ्यांची एकत्रित साठवण क्षमता ४८,२३३ सहस्र घन मीटर असून, दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर एकूण १३,४४६ हेक्टर क्षेत्राचे सिंचन शक्य होईल. त्यासाठी ९२ कोटी ७९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या वर्षी ३६ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जाईल.”

बैठकीत खासदार अनिल बोंडे तसेच प्रादेशिक व जिल्हास्तरीय यंत्रणेकडून माहिती सादर करण्यात आली. दुरुस्तीत लोखंडी पाट्यांऐवजी हॉट डीप गॅल्व्हनाईज्ड पाट्या बसविणे, निडल्स दुरुस्ती, रबर सील बसविणे अशा घटकांचा समावेश आहे.

९२ कोटी निधी

अमरावती जिल्ह्यातील ३०० बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर ५०.२३ कोटी खर्च अपेक्षित असून, या बंधाऱ्यांची एकत्रित साठवण क्षमता २८,४१९ सहस्र घन मीटर आणि संकल्पित सिंचन क्षमता ८,६७१ हेक्टर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १९० बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर रु. ४२.५६ कोटी खर्च अपेक्षित असून, या बंधाऱ्यांची एकत्रित साठवण क्षमता १९,८१३ सहस्र घन मीटर आणि संकल्पित सिंचन क्षमता ४,७७५ हेक्टर आहे.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें