धडाकेबाज कारवाई; करमाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली ५०,०००/- रु. चे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त..
(THE INDIA NEWS 24)
संपादक; अमित अल्हाट
करमाळा (सोलापूर), दि. २७ सप्टेंबर २०२५ – नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात गस्त घालत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ५० हजार रुपयांच्या किंमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टीआयएन२४ संपादक: अमित आळहत
करमाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रणजित माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.५० वाजता मौलाली माळ परिसरात ही घटना घडली. पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एक संशयित व्यक्ती कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई केली.
पथकातील पोलीस नाईक मनीष पवार यांनी दोन पंचांना सोबत घेऊन मौलाली माळ परिसरात शोध घेतला. अंधारात एका लाईटच्या खांबाच्या उजेडात संशयित व्यक्ती दिसून आली. पोलिसांना पाहताच तो पळण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने त्याला जागीच पकडले. आरोपीचे नाव अमिन रशिद बेग (वय ३३ वर्षे, रा. मौलाली माळ, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर) असल्याचे समोर आले.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन पितळी धातूच्या जिवंत काडतुसे मिळाली. या शस्त्रांचा परवाना नसल्याचे आरोपीने कबूल केले. पोलिसांनी हे साहित्य जप्त करून आरोपीला पोलीस ठाण्यात आणले. पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८७/२०२५ दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अमिन रशिद बेग हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी इतिहासाची यादी खालीलप्रमाणे आहे:
गुन्हा क्र. ०१: करमाळा पो. ठाणे गु. क्र. ११७/२०१४ – भा. द. वि. कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४
गुन्हा क्र. ०२: करमाळा पो. ठाणे गु. क्र. ११८/२०१४ – भा. द. वि. कलम ३९९, ४०२
गुन्हा क्र. ०३: करमाळा पो. ठाणे गु. क्र. २६९/२०२४ – एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii), (ब)
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अजित उबाळे करत आहेत. सदर कारवाई ही सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी (भा. पो. से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोहेकॉ अजित उबाळे, पोना मनीष पवार, पोना वैभव ठेंगल, पोकॉ रविराज गटकुळ, पोकॉ मिलिंद दहीहांडे, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ योगेश येवले, पोकॉ समाधान भराटे, पोकॉ अमोल रंदिल, पोकॉ गणेश खोटे आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ व्यंकटेश मोरे यांचा समावेश होता.
नवरात्रोत्सव काळात शहरातील सुरक्षेसाठी पोलिसांची ही कारवाई नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे. करमाळा पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
