आष्टी तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदत-बचाव कार्याला गती; नाशिकहून हॅलिकॉप्टर मागवले..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आष्टी तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदत-बचाव कार्याला गती; नाशिकहून हॅलिकॉप्टर मागवले..

 

TIN24 (THE INDIA NEWS 24)

संपादक: अमित अल्हाट

मुंबई, दि. १५ सप्टेंबर २०२५: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने मदत कार्याला गती दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातून लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, एअरलिफ्टसाठी नाशिकहून हॅलिकॉप्टर मागवण्यात आले आहे. तसेच, पुण्याहून एनडीआरएफचे पथक बीडकडे रवाना झाले असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.

 

आष्टी तालुक्यातील कडा गावात ११, सोभा निमगाव येथे १४, घाटा पिंपरी येथे ७, पिंपरखेड येथे ६, धानोरा येथे ३ आणि डोंगरगण येथे ३ अशा एकूण ४४ नागरिक पुरात अडकले आहेत. या सहा गावांतील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही आपत्कालीन कार्य केंद्राने स्पष्ट केले.

 

प्रशासन आणि बचाव पथके युद्धपातळीवर कार्यरत असून, अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. हवामान खात्याने पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा कायम ठेवला असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 

“TIN24” आपल्या वाचकांना या संकटकाळात प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन करते.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें