महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती; रायगड, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती; रायगड, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ..

 

 

TIN24 संपादक अमित अल्हाट

मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२५ : राज्यात गेल्या २४ तासांत अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला असून, पूर आणि अपघातांच्या घटना घडल्या आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दैनंदिन सद्यस्थिती अहवाल जारी केला आहे. यानुसार, पुढील २४ तासांत रायगड, सातारा आणि पुणे (घाट) जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूर, वर्धा, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांत पूरजन्य परिस्थितीमुळे वाहतूक ठप्प झाली असून, अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यात पूरामुळे वाहतूक ठप्प; शाळा आणि गावकऱ्यांना मदत

चंद्रपूर जिल्ह्यातील ता. वरोरा-निमसडा मार्गावरील वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे वरोरा-निमसडा जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. निमसडा गावातील एकूण ३२ शाळेतील विद्यार्थी आणि २५ ग्रामस्थ अडकले होते. अडकलेल्या नागरिकांची तात्पुरती व्यवस्था मोहबाळा येथे करण्यात आली आहे. निमसाळा येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, वर्धा नदी बामणी बल्लारशाह येथे शारा पातळीवर वाहत आहे.

 

वर्धा जिल्ह्यात पूरात अडकलेल्या नागरिकांची सुटका

वर्धा जिल्ह्यातील ता. हिंगणघाट मौजे अलीपुर येथील बोडलीच्या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात ९ नागरिक शेतात अडकले होते. सदर नागरिकांना पोलिस आणि गावातील नागरिकांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच, ता. आर्वी मौजे बार्हा-सोनगाव तलाव पूर्ण भरल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून तेथील ४५ कुटुंबातील १५० लोकांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.

 

परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यात बचावकार्य

परभणी जिल्ह्यातील ता. पूर्णा येथील थुना नदीच्या पात्रात ४ कामगार अडकले होते. स्थानिक आपत्ती शोध व बचाव पथक आणि अग्निशमन दल पूर्णा यांच्या माध्यमातून त्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वर्धानदी वरील कोसारा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तालुका वरोरा (सोईट) ते तालुका मारेगाव (कोळसा) रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.

 

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका; १४१ पर्यटक सुखरूप परतले

राज्यातील विविध भागातून नेपाळमध्ये अडकलेल्या एकूण १५७ पर्यटकांपैकी १४१ पर्यटक देशात सुखरूप परतले आहेत. उर्वरित पर्यटकांशी राज्य आपत्ती कक्षे द्वारे संपर्क करण्यात आला आहे. SEOC मार्फत नेपाळमधील भारतीय दूतावासाशी संपर्क करून अडकलेल्या पर्यटकांची सुरक्षेची खबरदारी, पुढील प्रवासाची, राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यास विनंती करण्यात आली आहे. तसेच पर्यटक आणि दूतावास यांची प्राप्त माहिती एकमेकांस देण्यात आली आहे.

 

गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस असलेले जिल्हे

गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

वर्धा: ५२.०९ मिमी

परभणी: ४० मिमी

चंद्रपूर: ३६.६ मिमी

हिंगोली: ३५.९ मिमी

यवतमाळ: २१.९ मिमी

 

दैनंदिन घटना अहवाल (१३ सप्टेंबर २०२५)

दैनंदिन घटना अहवालानुसार, वर्धा जिल्ह्यात भिंत पडून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच, पुराच्या पाण्यात वाहून जाऊन आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. प्राणी हानीची नोंद नाही.

 

राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पूर्वस्थितीकरण (Prepositioning)

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF):

मुंबई: कायमस्वरूपी २ पथके, मान्सूनसाठी ३ पथके

पालघर: कायमस्वरूपी १ पथक

ठाणे: मान्सूनसाठी २ पथके (१ ठाणे आणि १ कल्याण)

नागपूर: कायमस्वरूपी २ पथके

पुणे मुख्यालय: राखीव ८ पथके

एकूण: १८ पथके

 

राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF):

नागपूर: कायमस्वरूपी २ पथके

गडचिरोली: मान्सूनसाठी १ पथक

धुळे: कायमस्वरूपी २ पथके

नांदेड: मान्सूनसाठी १ पथक

एकूण: ६ पथके

 

पावसाची नोंद आणि विश्लेषण (कृषी विभाग, महाराष्ट्र शासन)

राज्यातील जिल्हानिहाय पावसाची नोंद (जूनपासून सप्टेंबरपर्यंत) खालीलप्रमाणे आहे. (सर्व आकडे मिमीमध्ये; सरासरीच्या टक्केवारीसह):

 

ठाणे: सरासरी २२४१.९, प्रत्यक्ष २२०७.३ (९८.४६%), जून-सप्टेंबर सरासरी २४३३.४ (९०.७१%)

रायगड: सरासरी २९१५.१, प्रत्यक्ष २३२२.१ (७९.६६%), जून-सप्टेंबर सरासरी ३१४८.६ (७३.७५%)

रत्नागिरी: सरासरी २९७१.८, प्रत्यक्ष २७८२.८ (९३.६४%), जून-सप्टेंबर सरासरी ३१९५.१ (८७.१%)

सिंधुदुर्ग: सरासरी २७५४.९, प्रत्यक्ष २५४४.५ (९२.३६%), जून-सप्टेंबर सरासरी २९४०.५ (८६.५३%)

पालघर: सरासरी २१२४.७, प्रत्यक्ष २१६०.८ (१०१.७%), जून-सप्टेंबर सरासरी २३०५.४ (९३.७३%)

नाशिक: सरासरी ८२९.८, प्रत्यक्ष ६२७.३ (७५.६%), जून-सप्टेंबर सरासरी ९३३.८ (६७.१८%)

धुळे: सरासरी ४७३.१, प्रत्यक्ष ४४९.७ (९५.०५%), जून-सप्टेंबर सरासरी ५३५.१ (८४.०४%)

नंदुरबार: सरासरी ७७७.३, प्रत्यक्ष ५६७.७ (७३.०३%), जून-सप्टेंबर सरासरी ८६०.४ (६५.९८%)

जळगाव: सरासरी ५६२.६, प्रत्यक्ष ५१६.६ (९१.८२%), जून-सप्टेंबर सरासरी ६३२.६ (८१.६६%)

अहमदनगर: सरासरी ३६४.८, प्रत्यक्ष २८१.५ (७७.१७%), जून-सप्टेंबर सरासरी ४४८.१ (६२.८२%)

पुणे: सरासरी ७७२.९, प्रत्यक्ष ६७४.५ (८७.२७%), जून-सप्टेंबर सरासरी ८६१.६ (७८.२८%)

सोलापूर: सरासरी ३८१.२, प्रत्यक्ष ३६६.८ (९६.२२%), जून-सप्टेंबर सरासरी ४८१.१ (७६.२४%)

सातारा: सरासरी ७९५.५, प्रत्यक्ष ६१७.६ (७७.६४%), जून-सप्टेंबर सरासरी ८८६.२ (६९.६९%)

सांगली: सरासरी ४३६, प्रत्यक्ष ४३४.९ (९९.७५%), जून-सप्टेंबर सरासरी ५१४.५ (८४.५३%)

कोल्हापूर: सरासरी १६२०.४, प्रत्यक्ष ११२२.८ (६९.२९%), जून-सप्टेंबर सरासरी १७३३.१ (६४.७९%)

छ. संभाजीनगर: सरासरी ४९६.४, प्रत्यक्ष ५१७.६ (१०४.२७%), जून-सप्टेंबर सरासरी ५८१.७ (८८.९८%)

जालना: सरासरी ५२२.७, प्रत्यक्ष ५८५.१ (१११.९४%), जून-सप्टेंबर सरासरी ६०३.१ (९७.०२%)

बीड: सरासरी ४६८.६, प्रत्यक्ष ४९३.७ (१०५.३६%), जून-सप्टेंबर सरासरी ५६६.१ (८७.२१%)

लातूर: सरासरी ६०३.४, प्रत्यक्ष ५९३ (९८.२८%), जून-सप्टेंबर सरासरी ७०६ (८३.९९%)

धाराशिव: सरासरी ४९८.४, प्रत्यक्ष ५३५.५ (१०७.४४%), जून-सप्टेंबर सरासरी ६०३.१ (८८.७९%)

नांदेड: सरासरी ७१९.५, प्रत्यक्ष ८९१.१ (१२३.८५%), जून-सप्टेंबर सरासरी ८१४.४ (१०९.४२%)

परभणी: सरासरी ६६५.५, प्रत्यक्ष ६४२ (९६.४७%), जून-सप्टेंबर सरासरी ७६१.३ (८४.३३%)

हिंगोली: सरासरी ७०७.६, प्रत्यक्ष ८१०.८ (११४.५८%), जून-सप्टेंबर सरासरी ७९५.३ (१०१.९५%)

बुलढाणा: सरासरी ५९१.१, प्रत्यक्ष ५८४.२ (९८.८३%), जून-सप्टेंबर सरासरी ६५९.४ (८८.६%)

अकोला: सरासरी ६२६.८, प्रत्यक्ष ६०८.५ (९७.०८%), जून-सप्टेंबर सरासरी ६९३.७ (८७.७२%)

वाशिम: सरासरी ७०८, प्रत्यक्ष ८७७.३ (१२३.९१%), जून-सप्टेंबर सरासरी ७८९ (१११.१९%)

अमरावती: सरासरी ७७५, प्रत्यक्ष ६५३.६ (८४.३४%), जून-सप्टेंबर सरासरी ८६२ (७५.८२%)

यवतमाळ: सरासरी ७३०.९, प्रत्यक्ष ८९७.५ (१२२.७९%), जून-सप्टेंबर सरासरी ८०५ (१११.४९%)

वर्धा: सरासरी ७८६.६, प्रत्यक्ष ९०८.१ (११५.४५%), जून-सप्टेंबर सरासरी ८७४.५ (१०३.८४%)

नागपूर: सरासरी ८२५, प्रत्यक्ष ८७६ (१०६.१८%), जून-सप्टेंबर सरासरी ९२०.४ (९५.१८%)

भंडारा: सरासरी १०४५.१, प्रत्यक्ष १००४.२ (९६.०९%), जून-सप्टेंबर सरासरी ११५७ (८६.७९%)

गोंदिया: सरासरी ११०७.७, प्रत्यक्ष १०५६.० (९५.३३%), जून-सप्टेंबर सरासरी १२२०.३ (८६.५४%)

चंद्रपूर: सरासरी ९८१.८, प्रत्यक्ष ११०५.४ (११२.५९%), जून-सप्टेंबर सरासरी १०८४ (१०१.९७%)

गडचिरोली: सरासरी ११४७.१, प्रत्यक्ष १४१०.३ (१२२.९४%), जून-सप्टेंबर सरासरी १२५४.१ (११२.४६%)

 

राज्य सरासरी: सरासरी ९०२.४, प्रत्यक्ष ८७१.५ (९६.५८%), जून-सप्टेंबर सरासरी १००४.२ (८६.७९%)

 

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात सुरक्षिततेच्या उपाययोजना अवलंबण्याचे सांगण्यात आले आहे.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें