**Atrocity act गुन्हा दाखल करण्यास नकार नागपाडा पोलीस स्टेशनवर गैरव्यवहाराचा आरोप: ACP शोभा पिसे यांच्यावर चौकशी रखडल्याचा ठपका**
मुंबई: नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जातीच्या (SC) व्यक्तीविरुद्ध खोटे आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप पोलीस अधिकारी अतुल प्रल्हाद पाटील (मोटर ट्रान्सपोर्ट विभाग) यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित अल्हाट यांनी डिसेंबर 2024 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, कांबळे यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 च्या कलम 18A अंतर्गत FIR दाखल करण्यास नकार दिला.
यानंतर अमित अल्हाट यांनी ACP शोभा पेसे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला. ACP शोभा पिसे यांनी तक्रार स्वीकारली, परंतु सात महिन्यांनंतरही ( 4 जुलै 2025 पर्यंत) FIR दाखल झालेली नाही. ACP शोभा पेसे यांनी सांगितले की, चौकशी अजूनही सुरू आहे. या प्रकरणात विलंब आणि कारवाई न झाल्याने अमित अल्हाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा आरोप आहे की, पोलीस अधिकारी अतुल प्रल्हाद पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करून खोटी कागदपत्रे तयार केली आणि जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणाने नागपाडा पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, अनुसूचित जातीविरुद्ध अत्याचाराच्या तक्रारींवर तातडीने कारवाई होणे अपेक्षित आहे. तक्रारकर्त्यांनी आता पुढील कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
