मुंबई, दि. २३ जून : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील उद्योजकांना ऑनलाइन मार्केटिंग, शासकीय योजना आणि व्यवसाय वृद्धीच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसआयसी) तर्फे विशेष शासकीय कार्यशाळेचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी मुंबईतील जुहू येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
एनएसआयसी, एमएसएमई मंत्रालय, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी), इनोव्हेशन अँड मेंटोरिंग हब, चेनेलियर, स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आदी संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या उद्योजकांना ‘एमएसएमई टीम’ योजनेअंतर्गत विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर मोफत नोंदणी, उत्पादनांच्या आकर्षक व योग्य पॅकेजिंगसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, बी-टू-सी आणि बी-टू-बी मार्केटिंगच्या संधी, विविध व्यावसायिक प्रदर्शनांमध्ये विनामूल्य सहभाग, तसेच ट्रेडमार्क, बारकोड आणि शासकीय अनुदान योजनांविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
मॅन्युफॅक्चरिंग (उत्पादन) तसेच सेवा क्षेत्रातील सर्व प्रकारचे उद्योजक या कार्यशाळेचा लाभ घेऊ शकतात. कार्यक्रमासाठी जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून, कार्यक्रमाला उपस्थित राहताना उद्यम प्रमाणपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी अथवा नाव नोंदणीसाठी इच्छुक उद्योजकांनी ८४८४८९८४६६, ८४८४९९०५४१ किंवा ९४०३२७८३६६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
– अमित अल्हाट
संपादक, TIN24 (The India News 24)

Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
