माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना बदनाम करण्याचा राजकीय कट कथित व्हॉइस क्लिप बनावट?; ग्राउंड इन्व्हेस्टिगेशनने उघडकीस आलेले सत्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

TIN24 EDITOR | Amit Alhat

“खोटा आवाज, खरी बदनामी?”
माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

माढा,14 जुलै : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करत सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या एका कथित व्हॉइस क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या क्लिपची सत्यता संशयास्पद असून, ती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना बदनाम करण्यासाठी राजकीय विरोधकांनी तयार केलेली बनावट क्लिप असल्याचे ग्राउंड इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आले आहे.

कथित ऑडिओमध्ये पंचायत समितीचे अधिकारी श्री. मुलाणी यांच्याशी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आणि धमकी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. पण विश्वसनीय सूत्रांनुसार ही क्लिप पूर्णपणे बनावट आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे माढा मतदारसंघातील एकमेव मोठे नेते आहेत जे कोणत्याही गैरप्रकारांशी कधीही समझोता करत नाहीत. त्यांच्या प्रामाणिक आणि कणखर भूमिकेमुळे काही राजकीय व्यक्ती त्यांना सतत टार्गेट करत असतात. या कथित व्हॉइस क्लिपमागेही त्यांचाच हात असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

माढातील सर्वसामान्य नागरिक चांगलेच जाणतात की, धैर्यशील मोहिते पाटील यांचा विकासकामांवर आणि जनसेवेवर भर आहे. अशा प्रामाणिक नेत्याला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे हे राजकीय हताशपणाचे लक्षण आहे. अद्याप कोणत्याही कायदेशीर पडताळणीत ही क्लिप खासदारांची असल्याचे सिद्ध झालेले नाही. ही फक्त राजकीय खेळी आहे.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें