देशात संविधानाचे राज्य आहे की सनातनीचे? दलित मुख्य न्यायमूर्ती बी.आर. गवईंवर न्यायालयातच हल्ला..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

TIN24 संपादक अमित अल्हाट

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२५: देशात संविधानाचे राज्य आहे की सनातनी कट्टरवादाचे, हा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. दलित समाजातील मुख्य न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्यावर एका वकिलाने शूज फेकण्याचा प्रयत्न केला, आणि तेही सनातन धर्माच्या नावाखाली हे काही सामान्य घटना नाही, तर संविधानाच्या मूल्यांवर थेट हल्ला आहे. ज्या न्यायालयात न्याय मिळवण्यासाठी लाखो लोक येतात, तिथेच न्यायाधीशाचा अपमान हे कट्टरवाद्यांचे षडयंत्र आहे की देशातील व्यवस्थेचा अपमान.

सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोरने मुख्य न्यायमूर्ती गवईंवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न; सनातन धर्माच्या नावाखाली दलित न्यायाधीशाचा अपमान – हा संविधानाचा अपमान आहे की सनातनी कट्टरवादाचा विजय.

घटना काय घडली; सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट नंबर १ मध्ये सकाळी ११:३५ च्या सुमारास वकील राकेश किशोर (७१ वर्षे) याने मुख्य न्यायमूर्ती गवईंवर चप्पल फेकली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने पकडले, पण तो ओरडत म्हणाला, “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” हे कशामुळे कारण मुख्य न्यायमूर्ती गवईंनी मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरातील विष्णू मूर्तीच्या दुरुस्तीच्या याचिकेवर टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटले होते, “देवताला स्वतःला विचारा.” ही सामान्य टिप्पणी, पण कट्टरवाद्यांना ती सनातन धर्माचा अपमान वाटली हे काही न्याय नाही, तर दलित न्यायाधीशाला लक्ष्य करण्याचे षडयंत्र आहे.

मुख्य न्यायमूर्ती गवईंनी शांत राहून म्हणाले, “या गोष्टी मला प्रभावित करत नाहीत. सुनावणी सुरू ठेवा.” पण हा अपमान फक्त व्यक्तिगत नाही, तर संपूर्ण दलित समाजाचा आणि संविधानाचा आहे. गवई हे दलित समाजातील पहिले मुख्य न्यायमूर्ती आहेत, आणि त्यांच्यावर हल्ला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हल्ला सनातनी कट्टरवाद्यांना संविधानाच्या समानतेची अॅलर्जी आहे का? देशात दलितांना न्याय मिळणार नाही का

याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी आरोपी वकिलाविरुद्ध कोणतेही गुन्हे दाखल करण्यास नकार दिला आणि दिल्ली पोलिसांना त्याच्या चप्पल आणि कागदपत्रे परत करण्यास सांगितले. हे काय आहे? न्यायालयाची उदारता की दबाव रजिस्ट्रार जनरल म्हणाले की, मुख्य न्यायमूर्तींच्या सूचनेनुसार आरोपीला सोडण्यात आले, पण हे अपमान करणाऱ्यांना प्रोत्साहन देणारे नाही का, बार काऊंसिल ऑफ इंडियाने (बीसीआय) राकेश किशोरला तात्पुरते निलंबित केले आहे आणि अनुशासनात्मक कारवाई सुरू केली आहे, पण हे पुरेसे आहे का हे कट्टरवाद्यांना रोखणार का?

कलबुर्गीत दलित संघटनांनी या हल्ल्याविरुद्ध निदर्शने केली, “सांप्रदायिकतेचा निषेध” आणि “न्यायालयाच्या अपमानाला शर्म” अशा घोषणा दिल्या. काँग्रेस, सीपीआयएम आणि इतर पक्षांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीला जबाबदार ठरवले. पण प्रश्न हा आहे – सनातनी नावाखाली दलितांना लक्ष्य करण्याचे हे प्रकरण कधी थांबणार संविधानाच्या राज्यात असे हल्ले सहन केले जाणार नाहीत.

हे फक्त एका न्यायाधीशाचा अपमान नाही, तर देशातील लाखो दलितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. सरकार आणि न्यायव्यवस्था यावर कठोर कारवाई करेल की सनातनी कट्टरवादाला मोकळे रान देईल.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें