TIN24 EDITOR : AMIT ALHAT

०६ फेब्रु | मुंबई: देशभरातील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि वकिली व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने स्पष्ट केले आहे की एलएलबी (LL.B.) ही पदवी ही नियमित व पूर्णवेळ व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणूनच मान्य आहे. त्यामुळे संध्याकाळी, रात्री, अर्धवेळ, शनिवार-रविवार, ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण पद्धतीतून चालवले जाणारे एलएलबी अभ्यासक्रम २०००–२००१ पासून मान्य नाहीत.
BCI ने २००८ च्या कायदेशीर शिक्षण नियमांद्वारे ही भूमिका सातत्याने कायम ठेवली आहे.
या नियमांनुसार: एलएलबी हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेदररोज व आठवड्याचे ठराविक वर्गतास आवश्यक
किमान उपस्थिती बंधनकारक
सकाळी ८.०० ते संध्याकाळी ७.०० या कालावधीत शैक्षणिक अध्यापन
या निकषांनुसार संध्याकाळ, रात्री, अर्धवेळ, शनिवार-रविवार, सुट्टीतील, ऑनलाइन किंवा दूरस्थ एलएलबी अभ्यासक्रमांना कोणतीही वैधानिक मान्यता नाही.
महत्त्वाचे म्हणजे, १९९९–२००० या शैक्षणिक वर्षापर्यंत संध्याकाळी वर्गातून एलएलबी पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांना वकिली नोंदणीचा अधिकार आहे. मात्र त्यानंतर अशा पद्धतीने पदवी घेणाऱ्यांना वकिली नोंदणीचा अधिकार मिळत नाही.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
