मुंबई, दि. ३१ डिसेंबर २०२५ : नववर्षाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना, हे नवीन वर्ष महाराष्ट्राच्या समृद्धी आणि विकासाचे नवे पर्व घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. सरत्या वर्षातील कटू प्रसंग विसरून सकारात्मक आठवणींमधून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे, “सरत्या वर्षातील कटू प्रसंगांना विसरूया आणि सुमधूर आठवणींकडून प्रेरणा घेत, पुढे जाऊया. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर, नेतृत्व करणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच फडकत राहो, यासाठी आपण एकजूट करूया. महाराष्ट्राच्या मातीत आव्हाने स्वीकारण्याची धमक आहे. आव्हाने आलीच, तर त्यावर मात करण्याचा निर्धार करुया.”
पुढे ते म्हणाले, “नवे वर्ष नवचैतन्य घेऊन येणारे, आशा, आकांक्षांना बळ देणारे ठरेल.” नववर्ष सर्वांसाठी आरोग्यदायी, सर्वच क्षेत्रात भरभराट आणि समृद्धी घेऊन येणारे ठरावे, अशा शुभकामना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या विकासासाठी एकजूट होऊन काम करण्याचा संकल्प नववर्षाच्या निमित्ताने करूया, असा संदेश या शुभेच्छांमधून देण्यात आला आहे.
TIN24 संपादक : अमित अल्हाट
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
