TIN24|EDITOR – AMIT ALHAT

करमाळा –
दिनांक 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्यदल व पोलीस दलातील अनेक वीर जवानांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. या शूरवीरांच्या अद्वितीय शौर्याची आणि शहादतीची स्मृती जपण्यासाठी दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी करमाळा तालुक्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे नेतृत्व श्री. रंजीत माने – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे हे स्वतः करत असून हा उपक्रम पूर्णपणे देशसेवा, समाजभावना आणि मानवी कर्तव्यभावना म्हणून राबविण्यात येत आहे.

रक्ताची कमतरता आजही गंभीर – समाजाने पुढे येणे आवश्यक
अपघात, अत्यावस्थ रुग्ण, शस्त्रक्रिया किंवा आकस्मिक परिस्थितींमध्ये आजही रक्ताची कमतरता जाणवते.
म्हणूनच करमाळा तालुक्याने एकजुटीने आणि देशसेवेच्या भावनेतून हे रक्तदान अभियान उभे केले आहे.
शिबिराचे वैशिष्ट्य:
हे शिबिर कोणत्याही एका संस्थेचे नसून –
करमाळा तालुक्यातील सर्व नागरिकांचा सामूहिक सहभागातून आयोजित केलेले महाअभियान
रक्तदानाचे महत्त्व व फायदे (सर्व रक्तदात्यांसाठी):
ब्लड ग्रुप तपासणी मोफत
जन्मजात किंवा लपलेले रक्तासंबंधी आजार तपासणी मोफत
रक्तदान करणाऱ्याला आयुष्यभर अपघात झाल्यास रक्ताच्या बाटलीवर विशेष अल्प दरात सुविधा
(साधारण रक्त बाटली किंमत – ₹1600)
रक्तदान शिबिराचे आयोजन स्थळे – संपूर्ण करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर
करमाळा शहर पोलीस ठाणे
केम
कंदर
जेऊर
जिंती
जातेगाव
साडे
सालसे
वाशिंबे चौफुला
कोर्टी
हिसरे
या सर्व भागांमध्ये रक्तदान केंद्रे सुरू राहणार असून नागरिकांनी आपल्या सोयीच्या केंद्रावर सहभाग नोंदवावा.
सर्व नागरिकांना आवाहन
रक्तदान म्हणजे जीवनदान.
26/11 शहीदांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून देशकार्य व समाजकार्यास हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
