TIN24 संपादक अमित अल्हाट

करमाळा (सोलापूर), दि. २१ ऑक्टोबर २०२५ : करमाळा बस स्टँडवर दिवाळी सुट्टीच्या गर्दीत एका महिलेच्या हॅन्डपर्समधून १ लाख रुपयांचे सोने आणि ३ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याच्या गुन्ह्यात करमाळा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उकल करून महिला आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून, या कामगिरीचे कौतुक होत आहे.
घटनेचा तपशील :
घटनेची हकीगत अशी की, दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता फिर्यादी तृप्ती किरण जाधव (वय २८, रा. अनाळा, ता. परांडा, जि. धाराशिव; सध्या रा. साईनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे) या आपल्या मुलगा आणि भाचीसह पुण्याहून अनाळा येथे जाण्यासाठी करमाळा बस स्टँडवर उतरल्या. दुपारी १२ वाजता बस असल्याने त्या स्टँडवर थांबल्या होत्या. परांडा-अजिंठानगर बस आल्यावर गर्दीत चढ-उतर करत असताना त्यांच्या भाचीच्या हातातील गुलाबी रंगाची हॅन्डपर्स गायब झाली. त्यात १ लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र (सोन्याच्या वाट्या, २४ नग सोन्याचे मणी आणि काळे मणी), तसेच ३ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम (५००, २००, १००, ५०, २० रुपयांच्या नोटा) होती. एकूण १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा माल चोरीला गेला. याबाबत करमाळा पोलिस ठाण्यात गु.र.नं. ८५९/२०२५, भा.द.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल झाला.
पोलीसांची तातडीची कारवाई :
दिवाळी सुट्टीमुळे बस स्टँडवर गर्दी असल्याने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. (भा.पो.से.) यांनी करमाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत माने यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी ओळखली.
महिला आरोपी अटकेत :
आरोपी सुमन सोपान पिटेकर (वय ४०, रा. नानज जवळा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) ही बसने पळाली असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तिचा माग काढला. अटक केल्यानंतर तिच्या अंगझडतीत संपूर्ण चोरीचा माल जप्त करण्यात आला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
तपास व पथकाची कामगिरी :
या प्रकरणाचा पुढील तपास पो.हे.का. १९०८ बाळसराफ करत आहेत. सदर कामगिरीत पो.हे.का. १६४८ अजित उबाळे, पो.ना. ११६२ मनीष पवार, पो.ना. ९१२ वैभव ठेंगळ, पो.का. ४३८ रविराज गटकुळ, पो.का. ८५६ अर्जुन गोसावी, पो.का. ६८९ येवले, पो.का. २५ हनुमंत भराटे, पो.का. १५२४ अमोल रंदिले, पो.का. ९६१ गणेश खोटे, म.पो.का. १४४१ आशा बरकडे आणि सायबर सेलचे पो.हे.का. २२२ व्यंकटेश मोरे यांचा सहभाग होता.
करमाळा पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसरात सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
