एससी-एसटी पीडितांच्या न्यायासाठी लढा: रायगड आयुक्त सुनील जाधव यांचा धक्कादायक वक्तव्य – ‘जा कुठे जायचे तिकडे जा’ भ्रष्टाचार उघड, मुख्यमंत्री फडणवीस दखल घेतील का?
एससी-एसटी अत्याचार कायद्याच्या नावाखाली भ्रष्टाचाराची खुलेआम दांडी! रायगडचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांचा अपमानजनक वक्तव्य: ‘जा कुठे जायचे तिकडे जा’ – पीडितांना न्याय मिळण्याऐवजी धक्का.
TIN24
२० सप्टेंबर २०२५, मुंबई
मुंबई: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई येथे उपसचिव श्री. गोरवे यांच्या कार्यालयात दि. १८ सप्टेंबरला एससी-एसटी अत्याचार कायद्यांतर्गत पीडिताच्या भरपाईसाठी सुनावणी सुरू होती. मात्र, रायगडचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी दिलेल्या धक्कादायक विधानाने सर्वांनाच हादरवून सोडले. २०२१ मध्ये नोंदवलेल्या एफआयआर व दोषारोपा नंतर जवळपास पाच वर्षे झाली तरी पीडिताला नियमानुसार भरपाई मिळाली नाही. एससी-एसटी कायदा नियम २०१६ आणि केंद्र-राज्य सरकारच्या २०१६ च्या अधिसूचनांनुसार तात्काळ मदत मिळणे अपेक्षित असताना, जाधव यांनी पीडितांना उघडपणे अपमानित केले. “जा कुठे जायचे तिकडे जा, काय करायचे ते करा” असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रभरातील यंत्रणेच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याऐवजी पीडितांना धमकी दिली. ही आहे का देवेंद्र फडणवीस सरकारची ‘न्यायव्यवस्था’?
पाच वर्षांचा विलंब: नियमांचा अवमान की अधिकारी वरचढ?
एससी-एसटी अत्याचार कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवल्या नंतर ७ दिवसांत भरपाई देण्याचे बंधनकारक निर्देश आहेत. मात्र, सुनील जाधव यांनी हे सर्व नियम धाब्यावर बसवले. सामाजिक कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण दारडे यांच्या २६/०१/२०२० च्या अधिसूचनेनुसार “प्रत्येक एफआयआर कलमासाठी भरपाई देणे बंधनकारक नाही” असे सांगितले. पण पीडितांनी स्पष्ट केले की, एससी-एसटी कायद्याच्या कलम २३ नुसार नियम किंवा अधिसूचना फक्त केंद्र सरकार आणि संसदेची मंजुरी घेऊनच तयार होऊ शकतात. आयुक्त दारडे यांना स्वतंत्रपणे नियम बनवण्याचा अधिकार नाही तरीही जाधव यांनी म्हटले, “आम्ही आमच्या अधिकाऱ्यांचे आदेश पाळतोच.” हे म्हणजे काय? संसद आणि केंद्र सरकारपेक्षा आयुक्त दारडे वरचढ आहेत का? पीडितांनी थेट प्रश्न विचारला – आणि जाधव यांचे उत्तर? “जा कुठे जायचे तिकडे जा” महाराष्ट्रभरात हीच यंत्रणा चालू आहे, असे ते म्हणाले. हा आहे का ‘सामाजिक न्याय’चा खरा चेहरा’
सुनील जाधव यांचा ‘विशेष दर्जा’: पाच वर्षे एकाच ठिकाणी, बदलीच रद्द – कोण आहे मागे?Maharashtra Government Servants Regulation of Transfers Act, 2005
सुनील जाधव हे २०२० पासून रायगड कार्यालयातच आहेत – पाच वर्षांहून अधिक काळ शासन नियमांनुसार एकाच ठिकाणी इतका काळ राहणे बेकायदेशीर आहे. गेल्या वर्षी त्यांचे बादली झाली होती, पण श्रेष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या ‘संबंधांमुळे’ त्यांनी एका दिवसातच ते रद्द करून घेतले. कोण आहे या ‘ अधिकाऱ्यां’ मागे? सुनील जाधव यांच्यासाठी वेगळे नियम आहेत का? आता तर त्यांना रायगड आणि सातारा या दोन्ही सामाजिक कल्याण विभागांची दुहेरी जबाबदारी मिळाली आहे – डबल चार्ज म्हणजे डबल भ्रष्टाचाराची संधी! पीडितांनी हे सर्व उघड केले, पण उपसचिव यांनी फक्त बघ्याची भूमिका. ही यंत्रणा दलित आणि आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना संरक्षण देते का?
पीडितांची आक्रोशपूर्ण प्रतिक्रिया: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार, नाहीतर आंदोलन.
पीडितांनी स्पष्ट सांगितले की, “प्रवीण दारडे हे केंद्र आणि राज्य सरकार, संसदेपेक्षा मोठे आहेत का? सुनील जाधव यांच्या या वागणुकीमुळे आम्हाला न्याय मिळत नाही. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहोत. ते या प्रकरणाची दखल घेतील आणि आम्हाला न्याय देतील. अन्यथा, आम्ही रस्त्यावर उतरू आणि जोरदार आंदोलन करू!” हे प्रकरण केवळ एका पीडिताचे नाही, तर संपूर्ण एससी-एसटी समाजाच्या लढ्याचे आहे. अशा अधिकाऱ्यांना संरक्षण देणे म्हणजे कायद्याचा अवमान!
टीआयएन२४ टीमकडून हे प्रकरण तपासले जात आहे. सुनील जाधव आणि प्रवीण दारडे यांच्यावर कारवाई होईल का? मुख्यमंत्री साहेब, हे प्रकरण तुमच्या नजरेस येते का? अन्यथा, पीडितांचा रस्त्यावरील लढा वाढेल .
द इंडिया न्यूज २४– सत्याच्या बाजूने, नेहमीच
अमित अल्हाट, संपादक
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
