राज्य कौशल्य विद्यापीठासाठी ३३९ पदांच्या निर्मितीस मंत्रिमंडळाची हिरवी झेंडी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई | १८ नोव्हेंबर २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी एकूण ३३९ पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये २३२ शिक्षक तर १०७ शिक्षकेतर पदांचा समावेश आहे.

राज्यातील तरुण-तरुणींना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्याधारित उच्च शिक्षण देऊन त्यांना थेट रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यापीठाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यादृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

पदांचा तपशील :
शिक्षक पदे (एकूण २३२)
प्राध्यापक – ३४
सहयोगी प्राध्यापक – ६०
सहाय्यक प्राध्यापक – १३८
शिक्षकेतर पदे (एकूण १०७)
उप कुलसचिव – ७
सहाय्यक कुलसचिव – ७
कक्ष अधिकारी – १४
सहाय्यक कक्ष अधिकारी – ७
वरिष्ठ लेखापाल – ६
लेखापाल – १२
माहिती तंत्रज्ञान अधिकारी तथा सिनियर प्रोग्रामर – १
वरिष्ठ ग्रंथालय सहायक – १
कनिष्ठ ग्रंथालय सहायक – २
वरिष्ठ लिपिक – ८
कनिष्ठ लिपिक – ८
कनिष्ठ सहायक (सर्वसामान्य) – १
कनिष्ठ सहायक (वित्त) – १
तंत्रसहायक – ८
प्रयोगशाळा सहायक – २४

हा निर्णय महाराष्ट्रातील कौशल्य शिक्षणाला नवे परिमाण देणारा असून लवकरच विद्यापीठ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

– अमित अल्हाट
संपादक, TIN24

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें