TIN24 | EDITOR – AMIT ALHAT

दिल्ली, दि. १७ : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेल्या ४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (IITF) महाराष्ट्राचे दालन राज्याचा ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक विविधता आणि आधुनिक उद्योगक्षमता प्रभावीपणे जगासमोर मांडत आहे.

‘भागीदार राज्य’ या विशेष दर्जामुळे महाराष्ट्राच्या दालनाला यंदाच्या मेळ्यात विशेष आकर्षण लाभले असून, हे दालन राज्याच्या सर्वंकष प्रगतीचे प्रतीक असल्याचे मत महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी व्यक्त केले.
गायकवाड यांनी दालनाला भेट देऊन विविध विभाग आणि प्रदर्शन स्टॉल्सची पाहणी केली.
राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या पैठणी, कोल्हापुरी चप्पल, चामड्याच्या कलाकुसरी, हॅंड पेंटिंग, तसेच ग्रामीण भागातील स्वयं-साहाय्य गटातील महिलांनी सादर केलेले पारंपरिक खाद्यपदार्थ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

विशेषतः ‘मराठी भाषा दालन’ या संकल्पनेचे त्यांनी कौतुक करत राज्याच्या भाषिक संस्कृतीचा गौरव वाढवणारे हे सादरीकरण उल्लेखनीय असल्याचे नमूद केले.
उद्योजक, कारागीर आणि स्टार्टअप नवउद्योजकांशी संवाद साधत गायकवाड यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.
राज्य सरकारच्या धोरणांमुळे कारागीरांना राष्ट्रीय पातळीवर मिळणाऱ्या संधींबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीदरम्यान सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे उपस्थित होते.
महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या वतीने गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दालनाच्या संकल्पना, त्यामागील उद्दिष्टे, सहभागी विभाग, जिल्हे आणि एकूण रचनेबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24