TIN24 | EDITOR – AMIT ALHAT
मुंबई, दि. १७ : वेस्टर्न रेल्वे लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांच्या जॅकसन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या २०२५-२०३० या कार्यकाळासाठी निवडणुका आयोजित करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
यानिमित्ताने सहकारी निवडणूक प्राधिकरण, सहकार मंत्रालय, भारत सरकार यांच्या १७ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशानुसार, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उक्त आदेशानुसार सोसायटीच्या संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकांसाठी आवश्यक कार्यवाही आणि कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रम सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळावर — www.jacksonsociety.com — प्रकाशित करण्यात आला आहे. तसेच सोसायटीच्या नोंदणीकृत कार्यालयांमध्येही कार्यक्रमाची नोटीस लावण्यात आली आहे.
सोसायटीतील सर्व सदस्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
