TIN24 | Editor AMIT ALHAT

मुंबई, दि. १७ (TIN24): क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा युवा महोत्सव २०२५-२६ चा भव्य समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
चर्नी रोड येथील मारवाडी कमर्शिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे हा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
महोत्सवात १५० ते १६० युवक-युवतींनी विविध सांस्कृतिक, क्रीडा, कला व विज्ञान आधारीत स्पर्धांमध्ये जोशात सहभाग घेतला. उद्घाटन समारंभात दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
प्रारंभी क्रीडा अधिकारी अनिल घुगे यांनी महोत्सवाचे प्रास्ताविक करून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ट्रस्टी देवीचंदजी व प्राचार्या कुसुम पाठक यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचे मनोबल वाढवले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी युवकांना शुभेच्छा देत स्पर्धांमध्ये उत्कृष्टता साधण्याचे आवाहन केले.
विविध स्पर्धांची रंगत
महोत्सवात सांस्कृतिक, विज्ञान, चित्रकला, कथा-कविता लेखन, कौशल्य विकास व नवोपक्रम अशा विविध विभागांत स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र तज्ज्ञ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
लोककला विभाग: ग्लोरिया डिसोझा, नंदकिशोर मसुरकर, डॉ. शिवाजी वाघमारे
विज्ञान विभाग: जी. एम. पाटील, सुनील भुसारा
चित्रकला विभाग: रूपेश शाह, राजेंद्र नवाले
कथा-कविता विभाग: श्रीमती नंदिनी
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रद्धा गंभीर (सोमय्या कॉलेज) यांनी केले.
आयोजनात मान्यवरांचा सहभाग
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, क्रीडा कार्यकारी अधिकारी साहिल उतेकर, क्रीडा अधिकारी नेहा साप्ते व अनिल घुगे, क्रीडा मार्गदर्शक फुलचंद कराड, वरिष्ठ लिपिक रंगनाथ डुकरे, तसेच गुरुकुल ट्रस्टचे उमेश मोरकर आणि मारवाडी कमर्शिअल हायस्कूलचे मिश्रा सर यांचे विशेष योगदान लाभले.
रांगोळी स्पर्धेसाठी सर्वदा टीमचे सहकार्य विशेष उल्लेखनीय ठरले.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24