करमाळा एसटी स्टँडवर मोबाइल चोरी प्रकरणी महिला आरोपीस अटक; ३६ हजारांचा मोबाइल जप्त..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

करमाळा एसटी स्टँडवर मोबाइल चोरी प्रकरणी महिला आरोपीस अटक; ३६ हजारांचा मोबाइल जप्त..

 

करमाळा, दि. १८ सप्टेंबर २०२५ (TIN24 संपादक -अमित आल्हाट) – करमाळा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन महिलेचा मोबाइल चोरणाऱ्या एका महिला आरोपीला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोरीला गेलेला ३६ हजार रुपयांचा ओप्पो रेनो प्रो ४ मोबाइल जप्त केला आहे. पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे गुन्हा उघडकीस आला असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

 

या घटनेची हकीकत अशी की, दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता फिर्यादी मोहिनी शहाजी मोरे (वय ४०, रा. शेळगाव, ता. परंडा, जि. धाराशिव; सध्या रा. सातववाडी, हडपसर, पुणे) या पुण्याहून करमाळा एसटी बसने आपल्या गावी जात असताना करमाळा बस स्टँडवर उतरल्या. त्या परंडा एसटी बसमध्ये चढत असतानाच अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सॅकमधून ओप्पो रेनो प्रो ४ कंपनीचा मोबाइल चोरून नेला. या घटनेची तक्रार करमाळा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली असून, गु. र. नं. ७५८/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदर गुन्ह्याच्या तपासात करमाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित माने यांना आरोपी महिला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला योग्य सूचना देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी आणि तपासासाठी पथके रवाना केली. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी महिलेला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव छकुली प्रशांत भोसले (वय २४, रा. करपाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे आहे.

 

पोलिस ठाण्यात आणल्यानंतर आरोपीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, महिला पोलिस अंमलदारांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पंचनामा करून गुन्ह्यातील ३६ हजार रुपयांचा मोबाइल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब वाडगे करत आहेत.

 

ही कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. प्रितम यावलकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलिस निरीक्षक रणजित माने, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ अजित उबाळे (१६४८), पोना मनिष पवार (११६२), पोना वैभव ठेंगल (९१२), पोकॉ अर्जुन गोसावी (८५६), पोकॉ रविराज गटकुळ (४३८), पोकॉ अमोल रंदिल (१५२४), पोकॉ योगेश येवले (६८९), पोकॉ मिलिंद दहिहांडे (१६८), पोकॉ गणेश खोटे (९६१), मपोकॉ पारधी (१६६) आणि सायबर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ व्यंकटेश मोरे (२२२) यांचा सहभाग होता.

 

करमाळा पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गर्दीच्या ठिकाणी सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें