नवी मुंबई, १७ ऑक्टोबर २०२५: नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर कठोर कारवाई केली आहे. महापालिकेने नोटीस देऊनही संबंधितांनी त्याची दखल न घेतल्यामुळे, मा. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या ०३ सप्टेंबर २०२५ च्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे तसेच उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

आयशा अपार्टमेंट, भुखंड क्र. वाय-१ ए, सेक्टर-१९, शहाबाज बेलापूर येथील अनधिकृत बांधकामाला बेलापूर विभाग कार्यालयाने एमआरटीपी कलम ५३ (१ अ) अंतर्गत नोटीस बजावली होती. संबंधितांना अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटवण्याचे सांगण्यात आले होते, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून निवासी आणि अनिवासी वापर सुरूच ठेवला. २४ एप्रिल २०२५ रोजी इमारत रिक्त करण्याचे पत्र देण्यात आले होते, तर १४ ऑक्टोबर २०२५ रोजी ध्वनीक्षेपकाद्वारे इमारत बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अखेर १५ ऑक्टोबर २०२५ रोजी निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली.
या धडक मोहिमेत अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी बेलापूर विभागातील सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, सहायक अभियंता आत्माराम काळे आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. मोहिमेसाठी २५ मजूर, ६ हॅमर, २ गॅस कटर, १ पोकलेन आणि १ जेसीबी यासारखी साधनसामग्री वापरण्यात आली. तसेच, एनआरआय पोलीस ठाणे सीवूडचे अधिकारी-कर्मचारी, अतिक्रमण विभागातील पोलिस आणि सुरक्षारक्षक यांची मदत घेण्यात आली.
महापालिका प्रशासनाने सांगितले की, यापुढेही अशा अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई तीव्र करण्यात येईल. शहरातील नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
TIN24 संपादक अमित अल्हाट
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
