येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

TIN24 EDITOR – AMIT ALHAT

श्रीयश आयुर्वेदिक कॉलेजच्या नवीन वास्तूचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन .

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ नोव्हेंबर :आयुर्वेद ही भारतीय संस्कृतीशी आणि निसर्गाशी नाळ जोडणारी उपचार पद्धती असून तिचे महत्त्व जगभरात वाढत आहे. शिक्षण, उपचार आणि संशोधन या सर्व स्तरांवर आयुष मंत्रालयाकडून विशेष प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगताना “येणारा काळ हा आयुर्वेदाचा सुवर्णकाळ असेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सातार तांडा परिसरात उभारलेल्या श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या नूतन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड, श्रीयश प्रतिष्ठानचे बसवराज मंगरुळे, सचिव संगिता मंगरुळे, रुग्णालय अधीक्षक डॉ. परेश देशमुख, अधिष्ठाता स्वाती इटगे आदी मान्यवर उपस्थित होते.

आयुर्वेदाला जागतिक दर्जाचे मान्यता—”शाश्वत उपचार पद्धतीचा सुवर्णकाळ येत आहे” .

मुख्यमंत्री म्हणाले की, आयुर्वेद ही लक्षणांवर नाही तर रोगाच्या मुळाशी जाऊन उपचार करणारी शाश्वत पद्धती आहे. जगभरात आयुर्वेद उपचार पद्धतीचा वेगाने प्रसार होत असून भारतातही लाखो रुग्ण आयुर्वेद उपचारासाठी येत आहेत. शल्यचिकित्सा पद्धतीपासून कोविड काळातील प्रतिकारशक्तीवर्धक औषधांपर्यंत आयुर्वेदिक औषधींनी आपली परिणामकारकता सिद्ध केली आहे.

मराठवाड्याची ओळख—इलेक्ट्रिक व्हेईकल कॅपिटलसोबत आयुर्वेद संशोधनाचे नवीन केंद्र .

केंद्र सरकारमार्फत आयुर्वेद महाविद्यालयांना चालना देऊन कुशल वैद्य तयार करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढील दशकात भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल आणि २०४७ पर्यंत आर्थिक महासत्ता बनणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच, छत्रपती संभाजीनगरला इलेक्ट्रिक व्हेईकल कॅपिटल बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें