TIN24 EDITOR – AMIT ALHAT

मुंबई, दि. 16 : रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत असून कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेतीच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
‘संकल्प फाउंडेशन’ तर्फे राजभवन, मुंबई येथे आयोजित ‘नैसर्गिक कृषी : अनुपम भारतीय वारसा’ या चर्चासत्रात ते प्रशासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधत होते.
राज्यपाल म्हणाले की, मोठ्या प्रमाणात देशात रासायनिक खतांची आवक होत असून यामुळे गहू-तांदूळ यांसारख्या पिकांचे पोषणमूल्य कमी झाले आहे. भावी पिढ्यांची अन्नसुरक्षा आणि जलसुरक्षा टिकवण्यासाठी नैसर्गिक शेती अत्यावश्यक आहे.

नैसर्गिक व जैविक शेतीतील फरक स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, “रासायनिक व जैविक शेतीपेक्षा नैसर्गिक शेती मानव आणि सूक्ष्मजीव कल्याणाची आहे.”
धर्म, अर्थ, काम यांसाठी आवश्यक असणारे निरामय आरोग्य टिकवण्यासाठी पर्यावरण, दिनचर्या आणि योग्य भोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक तापमानवाढीच्या संकटात शेती सर्वाधिक प्रभावित होत असल्याने सर्वांनी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करावा आणि नैसर्गिक उत्पादने खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कुमार तनेजा यांनी संस्थेने आतापर्यंत हजारो प्रशासकीय अधिकारी घडवले असून भारतीय सांस्कृतिक मूल्ये जपून कार्यरत असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे मुंबई संघचालक सुरेश भगेरिया, संकल्पचे महासचिव संतोष पाठक, सचिव राजू चौहान यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
