शाळांच्या गरजेनुसार सीएसआर निधीचा प्रभावी वापर व्हावा – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई, दि. १६ : राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमध्ये दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रथम संकल्पनेसह गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण मिळावे, यासाठी शासन विविध सुविधा पुरवत आहे. यासोबतच उद्योगांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीचा शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार सुसूत्रपणे उपयोग व्हावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

समाजाचे देणे लागतो या भावनेने अनेक उद्योग सीएसआर निधीच्या माध्यमातून शाळांना मदत करतात. या निधीच्या वापरात सुसंगती आणण्यासाठी मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात विविध उद्योगांच्या सीएसआर प्रमुखांशी बैठक घेतली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे सहसचिव डॉ. संतोष भोसले, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांच्यासह सीएसआर प्रमुख उपस्थित होते.

शासन विद्यार्थी केंद्रित योजना राबवत असून, शाळांमध्ये शिक्षक, शुद्ध पाणी, स्वच्छ शौचालये, मजबूत इमारती आणि प्रयोगशाळा यासारख्या सुविधा उपलब्ध करत आहे. विद्यांजली पोर्टलवर शाळांच्या गरजांची माहिती उपलब्ध आहे. उद्योगांनी या गरजांचा विचार करून सीएसआर निधीचे योगदान द्यावे, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.

प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी उद्योगांच्या सहकार्याने सीएसआर निधी उपलब्ध होत असल्याचे नमूद केले. ‘यूडायस’ आणि केंद्र सरकारच्या ‘विद्यांजली’ पोर्टलवर शाळांची माहिती उपलब्ध आहे. शाळांच्या मागणीनुसार निधीचा योग्य उपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्याने ‘दत्तक शाळा योजना’ सुरू केली असून, उद्योगांनी शाळा दत्तक घेतल्यास त्यांच्या नावासोबत उद्योगाचे नाव जोडले जाईल, असेही ते म्हणाले.

बैठकीत शालेय शिक्षण विभागाने सादरीकरणाद्वारे राज्यातील शिक्षणाची स्थिती, सीएसआर उपक्रम आणि आवश्यक सहकार्याबाबत माहिती दिली. सीएसआर प्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्राबाबत चर्चा केली. सर्वांनी मंत्री भुसे आणि शासनाचे आभार मानले.

TIN24 संपादक अमित अल्हाट

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें