— संपादक: अमित अल्हाट, TIN24

दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “ऑपरेशन पहाट” या समाजोपयोगी उपक्रमांतर्गत करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील गरजू पारधी समाजातील सात महिला व पुरुषांना आशेचा किरण लाभला आहे. या कुटुंबांना पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पुढाकाराने आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एकूण सात गाईंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रीतम यावलकर, सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती अंजना कृष्णा व्ही.एस. मॅडम आणि पोलीस निरीक्षक श्री. रणजीत माने यांच्या उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला. “ऑपरेशन पहाट” या मोहिमेतून समाजातील वंचित घटकांना गुन्हेगारी जगतापासून दूर ठेवून मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सुरू आहे.
या उपक्रमात संदीप जाधव (राहणार अहिल्यानगर) यांच्या पुढाकाराने आणि मराठा Entrepreneur Association, पुणे यांच्या वतीने गोधन वाटप पार पडले.

समाजातील दुर्बल घटकांना सशक्त बनवण्याचा हा एक प्रशंसनीय प्रयत्न ठरला आहे.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
