रणजित माने यांच्या ‘झीरो टॉलरन्स’ धोरणाने चोरट्यांची हवा टाईट: तीन गुन्हे उघडकीस, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत..
मोटारसायकल-मोबाईल हरवलेले परत; १,३५,४९९ रुपयांचा मुद्देमाल सापडला, नागरिकांकडून कौतुक.
करमाळा (TIN24): दि; १३ ऑगस्ट; करमाळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने दमदार कारवाई करत चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात दोन मोटारसायकल आणि एक मोबाईल फोन चोरी प्रकरणांचा समावेश असून, एकूण १,३५,४९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पीडित नागरिकांना त्यांच्या हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.
घटना क्रमांक १: दि. ११/०५/२०२५ रोजी फिर्यादी रमेश श्रीरंग खरसडे (वय ७६, रा. तांदुळवाडी, ता. परांडा, जि. धाराशिव) हे वैयक्तिक कामानिमित्त करमाळा येथे आले होते. त्यांनी त्यांची बजाज डिस्कव्हर मोटारसायकल (आरटीओ क्र. MH 25 Z 2093, लाल रंगाची पांढऱ्या पट्ट्यांसह) करमाळा बस स्टँडवर पार्क केली होती. परत आल्यावर ती गायब झाल्याचे लक्षात आले. शोध घेतल्यानंतरही न मिळाल्याने त्यांनी दि. ०९/०८/२०२५ रोजी करमाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६४८/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपासात गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी सचिन अर्जुन शिखरे (वय ३५, रा. जाम त्रिपुटे, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला पकडले. त्याच्या ताब्यातून सदर मोटारसायकल जप्त करण्यात आली. तपास पोहेकॉ आरकिले (क्र. ३७५) करत आहेत.
घटना क्रमांक २: दि. ०४/०८/२०२५ रोजी फिर्यादी औदुंबर ज्ञानदेव क्षिरसागर (वय ४२, रा. कृष्णाजी नगर, करमाळा) यांनी त्यांची हिरो पॅशन मोटारसायकल (आरटीओ क्र. MH 45 V 1113, काळ्या रंगाची पांढऱ्या पट्ट्यांसह) घराबाहेर पार्क केली होती. सकाळी ती गायब झाल्याचे आढळले. शोध घेतल्यानंतरही न मिळाल्याने गु.र.नं. ६५५/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ मोहोळकर (क्र. १६८२) करत आहेत. या प्रकरणातही आरोपी सचिन अर्जुन शिखरे याने कबुली दिली असून, मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
घटना क्रमांक ३: दि. ०८/०८/२०२५ रोजी फिर्यादी कल्याण सुभाष शिंदे (वय ३७, रा. घारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) हे करमाळा आठवडा बाजारात भाजी खरेदी करत असताना त्यांचा विवो Y16 मोबाईल (IMEI क्र. ८६९०१७०६८७७१४५४२ आणि ८६९०१७०६८७७१४४७) खिशातून गायब झाला. शोध घेतल्यानंतरही न मिळाल्याने गु.र.नं. ६५२/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी सुमित शिवाजी जाधव (वय १९, रा. नाळवंडी नाका, बीड) याला पकडले. त्याच्या ताब्यातून सदर मोबाईल जप्त करण्यात आला. तपास पोहेकॉ मोहोळकर (क्र. १६८२) करत आहेत.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना किश्ना व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली. पथकात पोहेकॉ अजित उबाळे (क्र. १६४८), पोना मनिष पवार (क्र. ११६२), पोना वैभव ठेंगल (क्र. ९१२), पोकॉ मिलिंद दहिहांडे (क्र. १६७), पोकॉ रविराज गटकुळ (क्र. ४३८), पोकॉ अमोल रंदिल (क्र. १५२४), पोकॉ योगेश रोवले (क्र. ६८९), पोकॉ गणेश खोटे (क्र. ९६१), पोकॉ हणुमंत भराटे (क्र. २५), पोकॉ अर्जुन गोसावी (क्र. ८५६) यांचा समावेश होता.
करमाळा पोलीस ठाण्याच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होत असून, नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे. पीडितांना त्यांच्या वस्तू परत मिळाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
