सांगलीत जाती द्वेषाच्या राक्षसी कटात “सामाजिक कार्यकर्त्याची क्रूर हत्या उत्तम मोहिते” यांचा वाढदिवस ठरला रक्तरंजित शेवट; १५-१६ गुंडांनी धारदार हत्याराने चिरफाड, sc/ST Act अंतर्गत मागणी उफाळली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली, १२ नोव्हेंबर २०२५ (TIN24 प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील इंदिरानगर येथे मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ता आणि दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हा हल्ला त्यांच्या वाढदिवशीच घडला असून, शाहरुख शेख, शिंदे, मोरे आणि १० ते १६ मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने वार करून त्यांना जागीच ठार केले. या घटनेने मातंग समाजात प्रचंड संताप पसरला असून, जाती भेदभावाच्या पार्श्वभूमीवर SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सांगलीत जाती द्वेषाच्या क्रूर कटकारस्थानात सामाजिक योद्धा उत्तम मोहिते यांची वाढदिवशीच निर्घृण हत्या! १०-१६ गुंडांनी धारदार हत्याराने चिरफाड…

पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा क्रमांक ५९२/२५ असून, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी नोंदवण्यात आला. मात्र, ही हत्या केवळ वादातून नव्हे, तर नियोजित पद्धतीने जाती द्वेषातून करण्यात आल्याचे मातंग समाज अन्याय अत्याचार निवारण संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष अमित अल्हाट यांनी सांगितले. त्यांच्या मते, उत्तम मोहिते यांचे सामाजिक कार्य, MSEDC मधील भ्रष्टाचाराविरोधातील लढा, वाढता लोकसंपर्क आणि लोकप्रियता यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. ते मातंग समाजातील असल्याने हा हल्ला जातीभेदभावाचा भाग आहे. मोहिते हे नगरपालिका निवडणुकीत उभे राहणार होते, त्यामुळे या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

अमित अल्हाट म्हणाले, “ही हत्या वादातून नव्हे, तर जाती द्वेषातून करण्यात आली आहे. उत्तम मोहिते यांचे सामाजिक कार्य आणि भ्रष्टाचाराविरोधातील भूमिका त्यांच्या शत्रूंना खटकत होती. मातंग समाजावर वाढते हल्ले आणि अन्याय-अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. गेल्या महिनाभरात मातंग समाजातील ७ युवकांना जबर मारहाण करण्यात आली, तर दोन युवकांची हत्या झाली. या सर्व प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. त्यांच्या कारकीर्दीत मातंग समाजावर अत्याचार वाढले आहेत.”

या घटनेने सांगली जिल्ह्यात तणाव निर्माण झाला असून, मातंग समाजाकडून न्याय मागण्यासाठी आंदोलने सुरू होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेणे आवश्यक असून, SC/ST अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल न झाल्यास समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होईल, असे अल्हाट यांनी स्पष्ट केले.

TIN24 कडून या प्रकरणावर सतत अपडेट्स देत राहणार असून, न्यायासाठी आवाज उठवण्याची गरज आहे.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें