जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन ..
मुंबई उपनगर जिल्ह्यातील खेळाडू आणि मार्गदर्शकांसाठी संधी; इच्छुकांनी त्वरित अर्ज सादर करावेत
मुंबई, दि. १२ (टीआयएन२४) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार योजना राबविण्यात येत असून, मुंबई उपनगर जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शकांना गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारांसाठी इच्छुकांनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.
सन २०२४-२५ या वर्षासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) तसेच क्रीडा मार्गदर्शक या चार गटांतून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळणार असून, त्यामुळे नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असे मत रश्मी आंबेडकर यांनी व्यक्त केले.
इच्छुक खेळाडू आणि मार्गदर्शकांनी मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्जाच्या नमुन्यात खेळाडूच्या कामगिरीची तपशीलवार माहिती, प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. पुरस्कार निवड प्रक्रिया पारदर्शक असून, योग्यता आधारित असेल.
अधिक माहितीसाठी मनिषा गारगोटे यांच्याशी मोबाईल क्रमांक ८२०८३७२०३४ वर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. या योजनेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचा शासनाचा उद्देश असून, जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“TIN24” संपादक : अमित अल्हाट
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
