एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये होणार ..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये होणार ..

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्तावास मान्यता; बाधित दोन इमारतीतील ८३ प्रकल्पग्रस्तांना दिलासा

 

 

टीआयएन२४ संपादक : अमित अल्हाट

 

मुंबई, दि. ११ सप्टेंबर २०२५ : येथील शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला आहे. या निर्णयामुळे लक्ष्मी निवास व हाजी नुरानी चाळ या बाधित इमारतींमधील एकूण ८३ प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

वरळी-शिवडी कनेक्टर उभारणीसाठी एलफिस्टन ब्रिज पाडण्यात येणार असून, पिलर उभारणी करताना लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारती बाधित होणार आहेत. या इमारतींमधील रहिवाशांनी त्याच परिसरात म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या सदनिकांमध्ये पुनर्वसनाची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या मागणीला प्रतिसाद देत म्हाडातील आजूबाजूच्या परिसरातील सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. लक्ष्मी निवास इमारतीमधील ६० प्रकल्पग्रस्त आणि हाजी नुरानी चाळमधील २३ प्रकल्पग्रस्त अशा एकूण ८३ कुटुंबांचे पुनर्वसन आता त्याच भागात होणार आहे.

 

यापूर्वी या प्रकल्पासाठी एकूण १९ इमारती बाधित होणार होत्या. मात्र, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रचनात्मक बदल करून १७ इमारती प्रकल्पाच्या मार्गामुळे बाधित होणार नाहीत याची काळजी घेतली आणि मार्ग बदलला. यामुळे केवळ रहिवाशांचे पुनर्वसन सुलभ झाले नाही, तर पुनर्वसनावर होणारा सुमारे ५२०० कोटी रुपयांचा खर्च वाचवला गेला. तसेच, या निर्णयामुळे प्रकल्पाची गती वाढून तो निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

पुनर्वसनाचे निकष

पुनर्वसन प्रक्रियेत खालील निकष लागू करण्यात येणार आहेत:

– ३०० चौ. फु. पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या घरमालकांना – ३०० चौ. फु. + ३५% अतिरिक्त क्षेत्र = एकूण ४०५ चौ. फु. क्षेत्राची सदनिका देण्यात येईल.

– ३०० ते १२९२ चौ. फु. क्षेत्रामधील घरमालकांना – विद्यमान क्षेत्र + ३५% अतिरिक्त क्षेत्रफळ प्रमाणे नवे घर दिले जाईल.

 

हा निर्णय रहिवाशांच्या हिताचा असून, शहर विकासाच्या प्रकल्पांमध्ये नागरिकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण अधोरेखित करतो. यामुळे प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मूळ परिसरातच राहण्याची संधी मिळेल आणि शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें