करमाळा पोलिसांचा धडाका – अवैध गोवंश वाहतूक थांबवली; २७ जनावरांना मिळाले जीवनदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

TIN24- संपादक अमित अल्हाट

करमाळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई – अवैध जनावरांची वाहतूक रोखली, २७ गोवंशांना मिळाले नवजीवन.

दि. ६ नोव्हेंबर २०२५ – करमाळा पोलीस ठाण्याच्या दक्ष पथकाने दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैधरित्या कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या तब्बल २७ जनावरांना वाचवले आहे. पोलिसांच्या या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे १४ जर्सी गायी, ८ खिलार आणि ५ जर्सी बैलांचा जीव वाचला आहे.

पहिली कारवाई ५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास करण्यात आली. करमाळा–पांडे रोडवर टेम्पो (एमएच-४२ बीएफ ४९९०) मध्ये संशयास्पदरीत्या जनावरे वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई ढोरे आणि त्यांच्या पथकाने वाहन थांबवून तपास केला असता, १४ गायी दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत आढळल्या. वाहनचालक जगनाथ साळवे (रा. राशीन) व त्याचा साथीदार मुजाहिद कुरेशी (रा. राशीन) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी कारवाई ६ नोव्हेंबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास करण्यात आली. जामखेड चौकात नाकाबंदी दरम्यान एक आयशर टेम्पो (एमएच-०३ ईजी ४०५२) थांबवला असता त्यातून ८ खिलार व ५ जर्सी बैल कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळले. त्यात मुंबईतील शकील शेख आणि जामखेड येथील जमीर कुरेशी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सर्व जनावरांना शासनमान्य गोशाळेत हलवून त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे. करमाळा पोलिसांच्या या कारवाईचे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून कौतुक व्यक्त केले जात आहे.

या मोहिमेला सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. प्रितम यावलकर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. या कारवाईत करमाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित माने, पोसई ढोरे, पोहेकॉ बाळसराफ, हिंगमिरे, पोकॉ पवार, भराटे, कांबळे आणि कदम यांनी सहभाग नोंदवला.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें