TIN24 संपादक: अमित अल्हाट
मुंबई, ७ ऑक्टोबर २०२५: राज्यातील १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण आज काढण्यात आले. या आरक्षण सोडतीत विविध प्रवर्गांसाठी जागा वाटप करण्यात आल्या असून, महिलांसाठी मोठ्या प्रमाणात आरक्षण देण्यात आले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरक्षणाच्या तपशीलानुसार, अनुसूचित जातीसाठी (एससी) एकूण १८ जागा आरक्षित आहेत. यात महिलांसाठी ९ आणि सर्वसाधारणसाठी ९ पदे आहेत. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) १३ जागा असून, महिलांसाठी ७ आणि सर्वसाधारणसाठी ६ पदे आरक्षित आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ४० पदे राखीव असून, महिलांसाठी २० आणि सर्वसाधारणसाठी २० पदे आहेत. खुल्या प्रवर्गासाठी एकूण ७६ जागा असून, महिलांसाठी ३८ आणि सर्वसाधारणसाठी ३८ पदे आरक्षित करण्यात आली आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव:
महिलांसाठी आरक्षित नगरपंचायती (९ पदे):
१. निलडोह, २. गोधनी(रेल्वे), ३. कोरची, ४. बहादुरा, ५. धानोरा, ६. गौंडपिंपरी, ७. ढाणकी, ८. अहेरी, ९. बेसा-पिपळा.
अनुसूचित जाती प्रवर्ग (सर्वसाधारण):
येरखेडा, कांद्री (कन्हान), भिसी, कुरखेडा, देवरी, माळेगांव(ब्रु.), बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा, भातकुली, दहीवडी.
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव:
महिलांसाठी आरक्षित नगरपंचायती (७ पदे):
भिवापूर, अर्जुनी-मोरगांव, सिरोंचा, हिंगणा, समुद्रपूर, पाली, देवळा.
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) (६ पदे):
कोरपणा, कळंब, माणगांव, गोरेगांव, सेलू, सिंदेवाही.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव (४० पदे):
सर्वसाधारण गटासाठी आरक्षित (२० पदे):
पारनेर, तळा, खानापूर, पालम, मंठा, कोंढाळी, माळशिरस, एटापल्ली, झरी-जामणी, पोंभूर्णा, माहूर, आटपाडी, मालेगांव-जहांगिर, तिर्थपूरी, कणकवली, शिरुर-कासार, विक्रमगड, अकोले, मोखाडा, सुरगणा.
नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित (२० पदे):
घनसावंगी, भामरागड, मंचर, पाटोदा, माढा, कळवण, सावली, मानोरा, मारेगांव, आष्टी, जि.वर्धा, तलासरी, वडवणी, पोलादपूर, खालापूर, शिरुर-अनंतपाळ, जाफ्राबाद, चाकूर, आष्टी, जि.बीड, जिवती, कर्जत, जि.अहिल्यानगर.
खुल्या प्रवर्गासाठी नगरपंचायती (एकूण ७६ पदे):
खुला (सर्वसाधारण) (३८ पदे):
शेंदूर्णी, साक्री, सालेकसा, कवठे-महांकाळ, देवणी, मोताळा, अर्धापूर, बोदवड, हिमायतनगर, कसई-दोडामार्ग, मुलचेरा, धडगांव-वडफळ्या, कुडाळ, कोरेगांव, दापोली, वाभवे-वैभववाडी, निफाड, चंदगड, चार्मोर्शी, बदनापूर, कारंजा, धारणी, फुलंब्री, हातकणंगले, लोहारा (ब्रु.), मुरबाड, केज, आजरा, संग्रामपूर, खंडाळा, वडूज, देवगड-जमसंडे, नेवासा, मौदा, शिराळा (जि.सांगली), नायगाव, सेनगाव, महागाव.
खुला प्रवर्गातील महिलांसाठी (३८ पदे):
१. बाभुळगांव, २. मुक्ताईनगर, ३. कुही, ४. देहू, ५. शहापूर, ६. पारशिवनी, ७. वडगांव-मावळ, ८. तिवसा, ९. मंडणगड, १०. शिंदखेडा, ११. लांजा, १२. देवरुख, १३. वाडा, १४. लोणंद, १५. मेढा, १६. जळकोट, १७. दिंडोरी, १८. सडक-अर्जुनी, १९. म्हसळा, २०. नातेपुते, २१. रेणापूर, २२. लाखणी, २३. औंढा-नागनाथ, २४. पाटण, २५. पेठ, २६. कडेगांव, २७. अनगर, २८. महादूला, २९. सोयगांव, ३०. वैराग, ३१. लाखांदूर, ३२. राळेगांव, ३३. गुहागर, ३४. नांदगांव-खडेश्वर, ३५. महाळुंग-श्रीपूर, ३६. वाशी, जि.धाराशिव, ३७. बार्शी-टाकळी, ३८. मोहाडी.

याशिवाय, राज्यातील २४७ नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांचेही आरक्षण जाहीर झाले असून, खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ६८ जागा आरक्षित आहेत. यातील काही प्रमुख नगरपरिषदा अशा: सावनेर, २६. मंगळवेढा, २७. कळमनूरी, २८. आर्वी, २९. किनवट, ३०. कागल, ३१. संगमनेर, ३२. मुरगुड, ३३. साकोली, ३४. कुरुदंवाड, ३५. पुर्णा, ३६. कळंब, ३७. चांदुररेल्वे, ३८. चांदुरबाजार, ३९. भुम, ४०. रत्नागिरी, ४१. रहिमतपूर, ४२. खेड, ४३. करमाळा, ४४. वसमत, ४५. हिंगणघाट, ४६. रावेर, ४७. जामनेर, ४८. पलुस, ४९. यावल, ५०. सावंतवाडी, ५१. जव्हार, ५२. तासगांव, ५३. राजापूर, ५४. सिंधीरेल्वे, ५५. जामखेड, ५६. चाकण, ५७. शेवगांव, ५८. लोणार, ५९. हदगांव, ६०. पन्हाळा, ६१. धर्माबाद, ६२. उमरखेड, ६३. मानवत, ६४. पाचोरा, ६५. पेण, ६६. फैजपूर, ६७. उदगीर, ६८. अलीबाग.
आरक्षण सोडत पारदर्शकपणे राबविली – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली, असे सांगून महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या भगिनींना तसेच या निवडणुकीसाठी सर्वांना नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुभेच्छा दिल्या.
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
