ग्रीन स्टील उद्योगांसाठी नवे धोरण लवकरच; महाराष्ट्रात हरित अर्थव्यवस्था मजबूत होणार..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई (टीआयएन२४ वृत्तसेवा): महाराष्ट्र सौर पॅनेल निर्मिती क्षेत्रात देशात आघाडी घेत आहे. या क्षेत्रातील भरीव प्रगतीमुळे एक मोठी ‘ग्रीन इको सिस्टीम’ निर्माण होत आहे. ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्याने, त्यासंदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी एका समितीचे गठण करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची १३वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील विशाल आणि अतिविशाल उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जागतिक कर संरचनेच्या बदलामुळे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील वस्त्रोद्योगावर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर, विद्युत शुल्क सवलतीची औद्योगिक अनुदानातून वजावट केली जाणार नाही. तसेच, विदर्भ आणि मराठवाडा या वर्गीकृत क्षेत्रांसाठी कॅप्टीव्ह प्रोसेस व्हेंडर संदर्भातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.”

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे वर्गीकरण ‘अ’ आणि ‘क’ वर्गीकृत तालुका क्षेत्रात करण्यात आले असल्याने, खेड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि खेड डेव्हलपर्स लि. यांना ‘क’ वर्गीकृत तालुक्याचे फायदे लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मे. ओपी मोबिलीटी एक्सटेरिअर इंडिया प्रा. लि. या कंपनीत ९० टक्के महिला कार्यरत असून, या कंपनीने पुणे जिल्ह्यातील स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या कंपनीला मोठ्या प्रकल्पाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर, थ्रस्ट सेक्टर धोरणांतर्गत प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात ग्रीन स्टीलसाठी नियुक्त होणाऱ्या समितीने विचार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

फडणवीसांच्या नेतृत्वात ग्रीन इको सिस्टीम मजबूत; उद्योगांना प्रोत्साहन.

या बैठकीला मुख्य सचिव राजेश कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) ओ.पी. गुप्ता, अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास) असिमकुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय, सचिव (उद्योग) डॉ. पी. अनबलगन, सचिव (वस्त्रोद्योग) अंशू सिन्हा, एम.आय.डी.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु आणि उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह उपस्थित होते.

TIN24 संपादक: अमित अल्हाट

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

और पढ़ें