पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली सातारा शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी; प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवर व्यक्त केले समाधान..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

TIN24

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली सातारा शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी; प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवर व्यक्त केले समाधान

 

 

सातारा, दि. ६ ( संपादक : अमित अल्हाट, TIN24) – गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजना पाहून समाधान व्यक्त केले.

 

या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट आदी उपस्थित होते.

 

पाहणी प्रसंगी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, नगरपालिकेच्यावतीने सातारा शहरात विविध ठिकाणी कृत्रिम कुंड व कृत्रिम तलाव उभारण्यात आलेले आहेत. या तलावांमध्येच नागरिकांनी गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करावे. जे डॉल्बी चालक आवाजाची मर्यादा पाळणार नाहीत अशा डॉल्बींवर कारवाई करण्याच्या सूचना यापूर्वीच पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातारा शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. गेल्या दहा दिवसात ज्याप्रमाणे शांततेत गणेशोत्सव साजरा झाला त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाच्या दिवशीही नागरिकांनी शांततेत व उत्साहात गणेश विसर्जन करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

 

TIN24 न्यूज टीमने या घटनेची सविस्तर माहिती घेतली असून, गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात सातारा शहरात शांतता राखण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले जाते. नागरिकांनी नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

The India News 24
Author: The India News 24

TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24

Leave a Comment

और पढ़ें