मुंबई, दि. ३ ऑक्टोबर २०२५ (TIN24): केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून, त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण १० ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त आहे.
या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीने आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसेच आपल्या कल्याणकारी व विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. या अग्रीम रकमेमुळे राज्यातील विविध विकास प्रकल्पांना गती मिळेल आणि सणांच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Tin24 संपादक: अमित अल्हाट
Author: The India News 24
TIN24 (The India News 24) The India News 24 (TIN24) is a Mumbai-based news Digital Media focusing on breaking news, local and regional issues in India, with content primarily in Marathi. It was established with an X (Twitter) presence since July 2022. Owner & News Editor: Amit Alhat Education: BA in Mass Communication Journalism (Graduate) Experience: 12 years in journalism Platforms: - Website: https://theindianews24.in - X (Twitter): https://x.com/the_indianews24 - YouTube: https://www.youtube.com/@theindianews247 - Instagram: https://www.instagram.com/theindianews_24
